ऑनलाईन लॉटरीच्या आड जुगार चालविऱ्या ६ जणांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2021 08:39 PM2021-08-14T20:39:14+5:302021-08-14T20:40:40+5:30
पोलीस निरीक्षक अविराज कुराडे व त्यांच्या पथकाने भाईंदर पश्चिमेच्या साई विला भागात ऑल इंडिया स्किल नावाच्या ऑनलाईन गेम द्वारे १० रुपयाला ९० रुपये देण्यासाठी पावती देऊन शासनाची कुठलीही परवानगी नसताना ऑनलाईन जुगार खेळवला जात होता.
मीरारोड - भाईंदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ऑनलाईन लॉटरीच्या नावाखाली चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर मीरा भाईंदरच्या स्थानिक गुन्हे शाखेने धाड टाकून ६ जणांना अटक केली आहे.
पोलीस निरीक्षक अविराज कुराडे व त्यांच्या पथकाने भाईंदर पश्चिमेच्या साई विला भागात ऑल इंडिया स्किल नावाच्या ऑनलाईन गेम द्वारे १० रुपयाला ९० रुपये देण्यासाठी पावती देऊन शासनाची कुठलीही परवानगी नसताना ऑनलाईन जुगार खेळवला जात होता.
पोलिसांनी धाड टाकून कालुलाल खेमराज डांगी (२४), राजू जांभळे (४२), संजोग शाह (२३), कुलदीप सेठीयार (३२), व विनोद सोलंकी (३८), वैभव शाह (३४) या ६ जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून रोख व कम्प्युटर, प्रिंटर असे साहित्य मिळून ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस उपनिरीक्षक राजू तांबे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.