सैन्यात मेजर असल्याचं सांगून 17 कुटुंबीयांना घातला गंडा, लग्नाचं आमिष दाखवत लुटले तब्बल 6 कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2020 02:27 PM2020-11-22T14:27:14+5:302020-11-22T14:34:40+5:30

Crime News : एका व्यक्तीने 17 कुटुंबामधील मुलींना लग्नाचं आमिष दाखवून तब्बल साडे 6 कोटी रुपये लुटल्याची घटना समोर आली आहे.

6 crore robbed of 17 families in name of marriage arrested themselves as army major | सैन्यात मेजर असल्याचं सांगून 17 कुटुंबीयांना घातला गंडा, लग्नाचं आमिष दाखवत लुटले तब्बल 6 कोटी

सैन्यात मेजर असल्याचं सांगून 17 कुटुंबीयांना घातला गंडा, लग्नाचं आमिष दाखवत लुटले तब्बल 6 कोटी

googlenewsNext

नवी दिल्ली - सैन्यात मेजर असल्याचं खोटं सांगून आणि लग्नाचं आमिष दाखवून तब्बल 17 कुटुंबीयांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका व्यक्तीने 17 कुटुंबामधील मुलींना लग्नाचं आमिष दाखवून तब्बल साडे 6 कोटी रुपये लुटल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी 42 वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. हैदराबादमध्ये फसवणुकीची ही घटना घडली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, मधुवथ श्रीनु नायक उर्फ श्रीनिवास चौहान असं या आरोपीचं नाव आहे. आंध्र प्रदेशातील प्रकाशम जिल्ह्यातील लमपल्ली गावाचा हा रहिवासी आहे. सैन्य दलात अधिकारी असल्याचा दावा करत त्याने तब्बल 17 कुटुंबीयांना फसवलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे त्याने आतापर्यंत साडे सहा कोटी रुपये लुटल्याची माहिती मिळाली आहे. बनाावट अधिकाऱ्याला पोलिसांनी अटक केली असून कसून चौकशी सुरू केली आहे.

कार आणि 85 हजार रुपयांची रोख रक्कम घेतली ताब्यात

पोलिसांनी आरोपीकडून तीन नकली पिस्तूल, सैन्य दलाची वर्दी आणि सैन्याचं बनावट ओळखपत्र जप्त केलं आहे. तसेच कार आणि 85 हजार रुपयांची रोख रक्कम देखील ताब्यात घेतली आहे. पोलिसांनी दिेलेल्या माहितीनुसार आरोपी हा फक्त नववी पास आहे. त्याने पोस्ट ग्रॅज्युएशन केल्याचं खोटं सर्टिफिकेट तयार करून घेतलं होतं. त्याला एक मुलगा आणि पत्नी असा परिवार आहे. त्याची पत्नी आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यात राहाते. 

17 कुटुंबीयांना दाखवलं लग्नाचं अमिष

आपल्याला सैन्यात नोकरी मिळाल्याची खोटी माहिती त्याने कुटुंबियांना देखील दिली होती. मॅरेज ब्यूरो अथवा ओळखीच्या लोकांच्या मदतीने तो लग्न करणारी मुलगी असलेलं कुटुंब शोधायचा आणि त्यांना आपली खोटी माहिती देऊन आपल्या जाळ्यात अडकवत असे. चौकशी दरम्यान ही माहिती समोर आली आहे. अशा 17 कुटुंबीयांना त्याने लग्नाचं आमिष दाखवलं होतं. तसेच त्यांच्याकडू कोट्यवधी रुपये उकळले होते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

Web Title: 6 crore robbed of 17 families in name of marriage arrested themselves as army major

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.