लोणावळ्यात एकाच रात्री तीन घरफोड्या; ६ लाखांचा ऐवज लंपास
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2019 14:07 IST2019-07-26T14:05:18+5:302019-07-26T14:07:17+5:30
भांगरवाडी विभागात तीन सदनिकांमध्ये चोरी करत सुमारे 5 लाख 62 हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.

लोणावळ्यात एकाच रात्री तीन घरफोड्या; ६ लाखांचा ऐवज लंपास
लोणावळा : जोरदार कोसळणार्या पावसाचा फायदा घेत चोरट्यांनी गुरुवारी रात्री ते शुक्रवार पहाटे दरम्यान भांगरवाडी विभागात तीन सदनिकांमध्ये चोरी करत सुमारे 5 लाख 62 हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.
भांगरवाडी येथील साईनाथ कृपा अपार्टमेंटमध्ये गणेश दत्तात्रय विकारी यांच्या बंद सदनिकेच्या दरवाजाचे कुलूप तोडत चोरट्यांनी कपाटामध्ये ठेवलेल्या साडे बावीस तोळे सोन्यावर हात मारला. याचसोबत वलवण येथिल ग्रीन वॉली अपार्टमेंट मध्ये राहणारे के.एन.व्ही. त्रिमुर्टुल रामाकुमार यांच्या घराचे लॅच लॉक उचकटून 32 इंची टिव्ही व 25 हजार रुपये रोख तसेच दामोदर कॉलनी भांगरवाडी येथील सागर वसंत लोकरे यांच्या घराचे कुलुप व कडीकोयंडा तोडत सोन्याची कर्णफुले व रोख रक्कम चोरीला गेली आहे.
लोणावळा शहर पोलीसांची सर्वत्र गस्त सुरु असताना देखील ह्या सलग चोर्या झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण असून शहर पोलिसांसमोर ह्या चोर्या उघड करण्याचे आवाहन निर्माण झाले आहे. सिसिटिव्ही फुटेजच्या सहाय्याने चोरट्यांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न शहर पोलिसांनी सुरु केला आहे. पोलीस निरीक्षक बी.आर.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिर उपनिरीक्षक राधिका मुंडे तपास करत आहेत.