गरोदर राहिल्यानंतर उघड झाला गुन्हा; १४ वर्षीय मुलीवर ६ नराधमांनी वारंवार केला बलात्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2021 21:16 IST2021-07-22T21:15:55+5:302021-07-22T21:16:34+5:30
Rape Case : या प्रकरणाबद्दल बोलताना डीएसपी म्हणाले की, जिल्ह्यात पॉक्सोच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

गरोदर राहिल्यानंतर उघड झाला गुन्हा; १४ वर्षीय मुलीवर ६ नराधमांनी वारंवार केला बलात्कार
तामिळनाडूतीलपोलिसांनी राज्यातील राजधानी चेन्नईपासून 540 किमी अंतरावर पोलाची येथे एका १४-वर्षाच्या मुलीवर वारंवार बलात्कार आणि तिचे अपहरण केल्याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. आरोपींवर पॉक्सो कायदा आणि भारतीय दंड संहितेच्या कलम ५०६ (गुन्हेगारी धमकी) अंतर्गत आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जेव्हा मुलीच्या पोटात दुखण्याची तक्रार समोर आली. तेव्हा तिला रुग्णालयात नेण्यात आले, त्यावेळेची डॉक्टरांनी ती पाच महिन्यांची गरोदर असल्याचे सांगितले. त्यानंतर तिच्या पालकांनी स्थानिक पोलिसांकडे जाऊन तक्रार दिली.
पोलिसांनी सांगितले की, तपासणी दरम्यान असे आढळल मुलीवर काही अल्पवयीन मुलांसह सहा जणांनी बलात्कार केला आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. पोलिसांनी दावा केला आहे की, ही मुलगी एका आरोपीशी "रिलेशनशिपमध्ये" होती. असा आरोप केला जात आहे की, त्याने आणि त्याच्या मित्रांनी मुलीवर लैंगिक अत्याचार केले.
या प्रकरणाबद्दल बोलताना डीएसपी म्हणाले की, जिल्ह्यात पॉक्सोच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अलीकडच्या काळात पोलाची आणि यापूर्वी वलपराई येथे जवळपास १५ अशीच प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत.