६ महिने, ९ हत्या, २५० गावातील गावकरी दहशतीत; 'साइको किलर'च्या टार्गेटवर महिला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2023 01:45 PM2023-11-30T13:45:33+5:302023-11-30T13:57:44+5:30

जिल्ह्यातील शाही आणि आसपासच्या परिसरात महिलांच्या हत्येचा सिलसिला सुरूच आहे. पोलिसांनी एका संशयिताला नशेच्या अवस्थेत ताब्यात घेतले.

6 months, 9 murders, 250 village villagers in terror; Women targeted by 'psycho killer' at Bareli, UP | ६ महिने, ९ हत्या, २५० गावातील गावकरी दहशतीत; 'साइको किलर'च्या टार्गेटवर महिला

६ महिने, ९ हत्या, २५० गावातील गावकरी दहशतीत; 'साइको किलर'च्या टार्गेटवर महिला

बरेली - उत्तर प्रदेशच्या बरेली जनपद इथं सध्या एका साइको किलरमुळे जवळपास २५० गावांतील गावकरी दहशतीखाली जगत आहेत. हा किलर महिलांना टार्गेट करत आहे. मागील ६ महिन्यात आतापर्यंत ९ महिलांची हत्या झाली आहे. या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत परंतु अद्याप निराशाजनक कामगिरी राहिली आहे. नुकतेच शीशगडच्या परिसरात उर्मिला नावाच्या महिलेची गळा दाबून हत्या करण्यात आली. ही महिला घरच्या छतावर चारा आणण्यासाठी गेली होती. तिथे तिची हत्या झाली. या घटनेत संशयाची सुई सीरियल किलरच्या दिशेने जात आहे. पोलिसांनी तपासाठी शोध पथके तयार केली आहेत. 

जिल्ह्यातील शाही आणि आसपासच्या परिसरात महिलांच्या हत्येचा सिलसिला सुरूच आहे. पोलिसांनी एका संशयिताला नशेच्या अवस्थेत ताब्यात घेतले. २० नोव्हेंबरला शाही ठाणे परिसरातून वृद्ध महिलेचा गळा दाबून हत्या करण्यात आली होती. आतापर्यंत ९ महिलांच्या हत्या झाल्यात. घटनास्थळावर ADG, SSP आणि फॉरेन्सिक टीम, डॉग स्क्वॉड बोलवले गेले. ज्याच्या मदतीने पोलीस या हत्येमागे कोण आहे याचा शोध घेत आहेत.बरेलीत या सीरियल किलरची दहशत निर्माण झाली आहे.सीरियल किलरने अनेक महिलांची हत्या केली आहे. ही हत्या नेमकी कशामुळे झाली याचा तपास पोलीस करत आहेत. 

शीशगढ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जमशेदपूरमध्ये उर्मिला (५५ वर्षे) नावाच्या महिलेची साडीने गळा आवळून हत्या करण्यात आली आणि तिच्याभोवती मेकअपचे सामानही फेकण्यात आले. या सर्व महिलांच्या हत्येचा एकच पॅटर्न आहे.प्रत्येकाचा गळा दाबून खून केला जात आहे. पोलिसांनी काही प्रकरणांचा खुलासा केला असला तरी सध्या ५ हून अधिक प्रकरणे प्रलंबित आहेत. गावातील रहिवासी वेदप्रकाश गंगवार यांच्या पत्नी रविवारी दुपारी शेतात जनावरांसाठी चारा गोळा करण्यासाठी गेल्या होत्या. ती परत न आल्याने जाफरपूरहून परतलेल्या तिच्या कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. त्यानंतर डोरीलाल यांच्या शेतापासून सुमारे ४०० मीटर अंतरावर रस्त्याच्या कडेला तुटलेल्या बांगड्या सापडल्या. महिलेच्या गळ्यात साडी बांधून ओढत नेऊन तिचा खून करण्यात आला.

घटनेची माहिती मिळताच एसपी सुशील चंद्रभान श्वान पथक आणि फॉरेन्सिक टीमसह घटनास्थळी पोहोचले आणि लवकरच आरोपीला अटक करू असं आश्वासन दिले आणि संपूर्ण टीम तैनात केली आहे. २० तारखेलाही शाही पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका महिलेची अशाच पद्धतीने हत्या करण्यात आली होती, तिचे विसरा रिपोर्टही जतन करण्यात आला आहे. गेल्या वर्षभरात ९ महिलांची हत्या झाली आहे. हत्येचे कारण समजू शकलेले नाही. या घटनेतील आरोपींचा पोलीस सातत्याने शोध घेत आहेत. अखेर महिलांना टार्गेट करणारा मारेकरी कोण? हे शोधण्याचं पोलिसांसमोर आव्हान आहे. 

Web Title: 6 months, 9 murders, 250 village villagers in terror; Women targeted by 'psycho killer' at Bareli, UP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.