लिफ्टमध्ये अडकून 5 वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2019 13:07 IST2019-01-05T12:58:25+5:302019-01-05T13:07:07+5:30
मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. मात्र, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

लिफ्टमध्ये अडकून 5 वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू
वसई - वसई पूर्व येथील सातिवली येथे आज एक दुर्दैवी घटना घडली आहे. सातिवली येथील डायस रेसिडेन्सी या सात मजली इमारतीच्या लिफ्टमध्ये अडकून 5 वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे. ही घटना आज दुपारी बारा वाजताच्या दरम्यान घडली. वालीव पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. मात्र, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
आज दुपारी बारा वाजताच्या सुमारास इमारतीच्या पहिल्या मजल्यावर राहणारा अंश गोंड (5) हा मुलगा लिफ्टमध्ये शिरला. मात्र, लिफ्टच्या फटीत त्याचा पाय अडकला आणि लिफ्ट सुरू झाली. त्यात त्याचा अडकून मृत्यू झाला. या प्रकरणानंतर रहिवाशी प्रचंड संतप्त झाले. ही लिफ्ट खराब होती आणि वांरंवार तक्रारी करूनही बिल्डरने ती दुरूस्त केली नसल्याचा आरोप रहिवाश्यांनी केली. प्रथमदर्शनी लिफ्ट व्यवस्थित काम करत नसल्याचे दिसून आले आहे. आम्ही या प्रकरणाची चौकशी करत असून त्यानंतर संबंधितांवर गुन्हे दाखल केले जातील, अशी माहिती वालीव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश बिराजदार यांनी दिली.
वसई पूर्व येथील सातिवली येथे आज एक दुर्दैवी घटना घडली आहे. सातिवली येथील डायस रेसिडेन्सी या सात मजली इमारतीच्या लिफ्टमध्ये अडकून 5 वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू झाला आहे.
— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) January 5, 2019