दुकानातून परतत असलेल्या १० वर्षीय तरुणीला ६० वर्षीय म्हाताऱ्याने रस्त्यात रोखले अन् केले अश्लील चाळे 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2021 07:04 PM2021-05-26T19:04:47+5:302021-05-26T19:07:53+5:30

Pocso Case : या प्रकरणात पोलिसांनी रूपवास रेल्वे स्टेशन भरतपूरहून अवघ्या ६ तासात अटक केली.

A 60-year-old man stopped a 10-year-old girl on the way back from a shop, do obscene acts at dholpur | दुकानातून परतत असलेल्या १० वर्षीय तरुणीला ६० वर्षीय म्हाताऱ्याने रस्त्यात रोखले अन् केले अश्लील चाळे 

दुकानातून परतत असलेल्या १० वर्षीय तरुणीला ६० वर्षीय म्हाताऱ्याने रस्त्यात रोखले अन् केले अश्लील चाळे 

Next
ठळक मुद्देपोलिसाने अनार सिंह नावाच्या ६० वर्षीय व्यक्तीला अटक केली. भरतपूरमधील रूपवास रेल्वे स्थानकातून त्यास अटक करण्यात आली आहे.

धौलपूर - राजस्थान राज्यात कोरोना संकट असून देखील अशा लज्जास्पद घटना समोर येत आहेत. या घटनांमुळे माणुसकीला काळिमा फासला जात आहे. धौलपूर जिल्ह्यातील कांचनपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत अशीच एक संतापजनक घटना घडली आहे. मंगळवारी पोलिसांनी दहा वर्षांच्या अल्पवयीन मुलीशी अश्लील कृत्य आणि विनयभंगाच्या प्रकरणात पोलिसांनी ६० वर्षीय आरोपीला अटक केली. या प्रकरणात पोलिसांनी रूपवास रेल्वे स्टेशन भरतपूरहून अवघ्या ६ तासात अटक केली.


रेल्वे स्थानकातून अटक
कांचनपूर पोलिस स्टेशनचे प्रभारी देवेंद्रकुमार शर्मा म्हणाले की, धौलपूरचे एसपी केसरसिंग शेखावत महिलांच्या गुन्ह्यांबाबत अत्यंत कठोर आहेत. त्यामुळे या गुन्ह्यात त्वरित कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. या प्रकरणात कायदा पाळत एक कारवाई केली आहे. यात पोलिसाने अनार सिंह नावाच्या ६० वर्षीय व्यक्तीला अटक केली. भरतपूरमधील रूपवास रेल्वे स्थानकातून त्यास अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी सांगितले की, आरोपीने दहा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून विनयभंग केला. पीडित मुलीकडून लेखी तक्रार पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली होती, म्हणून पोलिसांनी त्याला अटक केली.



मोबाईल लोकेशनचा मागोवा घेतला, त्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली
पोलिस स्टेशन प्रभारी म्हणाले की, तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी तत्परता दाखविली आणि तांत्रिक बाबींच्या मदतीने अवघ्या ६ तासात आरोपीला शोधले. मोबाईल लोकेशनच्या आधारे आरोपीला शोधून अटक केली आहे. पोलिस सूत्रांनी सांगितले की, मुलगी जवळील दुकानात काही वस्तू घेण्यासाठी गेली होती. त्यानंतर ६० वर्षांच्या आरोपीने मुलीला रस्त्यात रोखले. यानंतर त्याने तिच्याशी अश्लील वर्तन केले, ती मुलगी रडत घरी पोहोचली तेव्हा संपूर्ण प्रकरण कुटुंबीयांसमोर उघड झाले. यानंतर मुलाच्या वडिलांनी पोलिसांत याबाबत तक्रार दिली.

Web Title: A 60-year-old man stopped a 10-year-old girl on the way back from a shop, do obscene acts at dholpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.