सातारा हाॅस्पिटलची तब्बल ६२ लाखांची फसवणूक; दाम्पत्यासह चाैघांवर गुन्हा

By दत्ता यादव | Published: March 19, 2023 02:51 PM2023-03-19T14:51:51+5:302023-03-19T14:52:12+5:30

मेडिकलमधील औषधांच्या बिलामध्ये अफरातफर

62 lakh fraud of Satara Hospital; Crime against four including the couple | सातारा हाॅस्पिटलची तब्बल ६२ लाखांची फसवणूक; दाम्पत्यासह चाैघांवर गुन्हा

सातारा हाॅस्पिटलची तब्बल ६२ लाखांची फसवणूक; दाम्पत्यासह चाैघांवर गुन्हा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : येथील सातारा डायग्नोस्टिक सेंटर अँड मल्टिस्पेशालिटी हाॅस्पिटलमध्ये काम करणाऱ्या चार कर्मचाऱ्यांनी मेडिकलमधील औषधांच्या बिलामध्ये अफरातफर करून तब्बल ६२ लाख ७७ हजार ५४२ रुपयांचा घोटाळा केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात संबंधित कर्मचाऱ्यांवर संगनमत करणे, कटरचणे, फसवणूक करणे या कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नीलेश भानुदास नाईक उर्फ इग्रसी सॅनटन फर्नाडीस, प्रिया नीलेश नाईक (रा. न्यू सातारा नगर, वाई, जि. सातारा), सर्जिमेड एजन्सीचे मालक रविकिरण विलास पाटील (रा. मंगळवार पेठ, सातारा), अजित रामचंद्र कुलकर्णी (रा. यादोगोपाळ पेठ, सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.     याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, नीलेश नाईक हा इन्चार्ज फार्मासिस्ट म्हणून काम करत होता. त्याने 

 सातारा हाॅस्पिटलच्या मेडिकलमध्ये हेल्पर म्हणून काम करणाऱ्या अजित कुलकर्णी याच्या मदतीने सर्जिकल औषधे, इंजेक्शनची वेळोवेळी सर्जिमेड एजन्सीचे मालक रविकिरण पाटील यांच्याकडून खरेदी केली. त्याची बिले मेडिकलच्या रेकाॅर्डला ज्यादा दराने लावली. मेडिकलमधील सर्जिकल औषधांची तसेच इंजेक्शनची वेळोवेळी ग्राहकांना विक्री करून त्यातून येणाऱ्या रकमेचा अपहार करण्यासाठी हाॅस्पिटलमधील संगणकात असलेल्या साॅफ्टवेअरमधील नोंदी डिलीट केल्या. त्यामध्ये वेळोवेळी फेरफार करून काऊंटरला जमा झालेल्या रकमेपेक्षा कमी रक्कम त्याची पत्नी प्रिया नाईक हिला दिल्या.

रजिस्टरला चुकीच्या नोंदी घेऊन तसेच प्रिया नाईक या हाॅस्पिटलच्या नोकर असतानाही त्यांनी माई हाॅस्पिटलमधून येणारा रोजचा कॅश तसेच इतर हाॅस्पिटल व डायग्नोस्टिक सेंटर येथून येणारे असोएिसएट चार्जेस हाॅस्पिटलच्या खात्यावर जमा केले नाहीत. या चाैघांनी संगनमताने कट रचून तब्बल ६२ लाख ६६ हजार ५४२ हजारांचा घोटाळा केला. हा प्रकार हाॅस्पिटलने केलेल्या स्टाॅक ऑडिटमध्ये समोर आला. यानंतर सातारा हाॅस्पिटलचे सीईओ विक्रमसिंह सतीश शिंदे (वय ३९, रा. कूपर काॅलनी समोर, सदर बझार सातारा) यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. सहायक पोलिस निरीक्षक चेतन मछले हे अधिक तपास करीत आहेत.   

Web Title: 62 lakh fraud of Satara Hospital; Crime against four including the couple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.