मोलकरणीसोबत शारीरिक संबंधांदरम्यान 67 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, बेडशीट आणि प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळलेला सापडला मृतदेह!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2022 09:58 AM2022-11-25T09:58:42+5:302022-11-25T09:59:07+5:30
Crime News : पोलीस केसमुळे संबंधित महिलेने मृतदेह प्लास्टिक आणि बेडशीटमध्ये गुंडाळून रस्त्याच्या कडेला फेकून दिला होता.
कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये एका 67 वर्षीय व्यक्तीच्या मृत्यूप्रकरणी एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. मोलकरणीसोबत शारीरिक संबंधांदरम्यान या वृद्धाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे समजते. पोलीस केसमुळे संबंधित महिलेने मृतदेह प्लास्टिक आणि बेडशीटमध्ये गुंडाळून रस्त्याच्या कडेला फेकून दिला होता.
16 नोव्हेंबरला जेपी नगरमधील पुट्टनहल्ली येथील रहिवासी बाला सुब्रमण्यम हे आपल्या नातवाला बॅडमिंटन क्लाससाठी सोडण्यासाठी घरातून निघाले होते. दुपारी 4.55 च्या सुमारास बाला यांनी आपल्या सुनेला फोन केला आणि काही काम असल्याने घरी परतण्यास उशीर होईल असे सांगितले. यानंतर सायंकाळी ते घरी परतले नाहीत. त्यामुळे मुलाने आणि सुनेने त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचा मोबाईल नंबर बंद होता. रात्री उशिरापर्यंत त्यांची मुलाने वाट पाहिली, मात्र ते आले नाहीत. त्यानंतर त्यांच्या मुलाने सुब्रमण्य नगर पोलिस ठाण्यात जाऊन वडिलांच्या हरवल्याची तक्रारी दिली.
दुसरीकडे, दुसऱ्या दिवशी म्हणजेच 17 नोव्हेंबरला जेपी नगर 6 फेजजवळ पोलिसांना एक मृतदेह आढळून आला. मृतदेह प्लास्टिकच्या कव्हर आणि बेडशीटमध्ये गुंडाळून संशयास्पद स्थितीत होता. तपासात मृतदेहाची ओळख बेपत्ता बाला सुब्रमण्यम अशी झाली. त्यानंतर पोलिसांनी कुटुंबीयांनाही घटनास्थळी बोलावून मृताची ओळख पटवली. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. वृद्धाचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये आढळून आले.
याप्रकरणी पोलिसांचा तपास सुरू होता. चौकशीदरम्यान मृत बाला सुब्रमण्यम यांच्या 35 वर्षीय मोलकरणीने पोलिसांसमोर कबूल केले की, तिच्याशी संभोग करताना बाला यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचा मृत्यू झाला. यानंतर पोलीस आपल्या विरोधात खुनाची तक्रार दाखल करू शकतात, अशी मोलकरणीला भीती वाटत होती. त्यामुळे तिने प्लास्टिक आणि बेडशीटमध्ये मृतदेह गुंडाळून रस्त्याच्या कडेला फेकून दिला.
बाला सुब्रमण्यम यांचा मृतदेह पॅक करण्यासाठी तिने पती आणि भावाची मदत घेतली. पोलिसांनी सांगितले की, बाला सुब्रमण्यन यांचे मोलकरणीसोबत अनेक दिवसांपासून अवैध संबंध होते. मोलकरीच्या घरी कोणी नसायचे, तेव्हा ते तिच्या घरी जात होते. वृद्ध बाला यांच्यावर गेल्या वर्षीच अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया झाली होती.