मुंबईच्या ओढीमुळे ६८४ कोटींची फसवणूक करणारा ठग जाळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2021 06:26 AM2021-08-25T06:26:34+5:302021-08-25T06:26:52+5:30

मूळचा नेपाळचा असलेला सिंग याने फिनॉमिनल हाउसिंग फायनान्स इंडिया लिमिटेड, फिनॉमिनल प्लांटेशन लिमिटेड आणि फिनॉमिनल हेल्थ केअर सर्व्हिसेस नावाच्या कंपन्या उघडून लोकांना पैसे गुंतविण्यास सांगून ६८४ कोटींचा गंडा घातला.

684 crore fraudster Nandlal Kesar Singh caught in Mumbai | मुंबईच्या ओढीमुळे ६८४ कोटींची फसवणूक करणारा ठग जाळ्यात

मुंबईच्या ओढीमुळे ६८४ कोटींची फसवणूक करणारा ठग जाळ्यात

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईच्या ओढीमुळे ६८४ कोटींंची फसवणूक करणारा फिनॉमिनल ग्रुप ऑफ कंपनीचा अध्यक्ष नंदलाल केसर सिंग अखेर गुन्हे शाखेच्या जाळ्यात अडकला आहे. विविध योजनांच्या नावाखाली त्याने केरळ, कर्नाटक, महाराष्ट्रासह विविध ठिकाणी फसवणूक केली आहे.

मूळचा नेपाळचा असलेला सिंग याने फिनॉमिनल हाउसिंग फायनान्स इंडिया लिमिटेड, फिनॉमिनल प्लांटेशन लिमिटेड आणि फिनॉमिनल हेल्थ केअर सर्व्हिसेस नावाच्या कंपन्या उघडून लोकांना पैसे गुंतविण्यास सांगून ६८४ कोटींचा गंडा घातला. सिंगने भारतात विविध राज्यांत त्याचे दोन सिस्टीम मार्केटिंग जाळे वाढवले होते. केरळ राज्यात हॉस्पिटल उघडले होते. तेथे पैशाच्या कारणांवरून झालेल्या वादाप्रकरणी त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला. पुढे लोकांचे पैसे थकविल्यामुळे केरळ, कर्नाटक, महाराष्ट्रात विविध ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले. केरळ पोलिसांकडून त्याच्याविरुद्ध लुकआउट नोटीस जारी केली आहे. २०१८ पासून तो फरार होता.

अमेरिका, लंडनमध्ये तो ओळख लपवून राहत होता. त्यानंतर तो नेपाळमध्ये राहण्यास गेला. त्याला मुंबईची ओढ होती. याच ओढीत तो मार्च २०२१ मध्ये कुटुंबीयांसह भारतात आला. दिल्लीनंतर मुंबईमध्ये प्रवेश केला. हॉटेलमध्ये बुकिंगदेखील पत्नी आशा सोनारच्या नावावर करत होता. २२ ऑगस्ट रोजी तो नरिमन पॉइंट येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये थांबला असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या कक्ष-७ला मिळाली. त्यानुसार तपास पथकाने त्याला ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध सोलापूरच्या आर्थिक गुन्हे शाखेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे, सहाय्यक आयुक्त नितीन अलकनुरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष श्रीधनकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोगसिद्ध ओलेकर यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

Web Title: 684 crore fraudster Nandlal Kesar Singh caught in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.