69 कैद्यांना काेराेनाची लागण; नेहुली क्रीडा संकुलातील काेविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरु                                                                                

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2021 07:12 PM2021-07-12T19:12:20+5:302021-07-12T19:14:27+5:30

Crime News : अलिबागचे तहसीलदार सचिन शेजाळ यांची माहिती        

69 prisoners infected with caries; Treatment started at Cavid Care Center at Nehuli Sports Complex | 69 कैद्यांना काेराेनाची लागण; नेहुली क्रीडा संकुलातील काेविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरु                                                                                

69 कैद्यांना काेराेनाची लागण; नेहुली क्रीडा संकुलातील काेविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरु                                                                                

Next
ठळक मुद्देजिल्हाधिकारी निधी चाैधरी यांच्या आदेशा नुसार सरकारी कार्यालये, आस्थापने यामधील कर्मचारी यांची काेराेना चाचणी करण्याचे निर्देश आहेत. दाेन दिवसांपूर्वी अलिबाग येथील जिल्हा कारागृहातील 169 कैद्यांची काेराेना चाचणी करण्यात आली हाेती.

रायगड ः अलिबाग येथील जिल्हा कारागृहातील तब्बल 69 कैद्यांना काेराेनाची लागण झाली आहे. त्यांना तातडीने नेहुली क्रिडा संकुलातील काेविड केअर सेंटरमध्ये हलवण्यात आले. काेराेना पाॅझिटीव्ह कैद्यांवर वैद्यकीय पथकाच्या सहायाने उपचार सुरु करण्यात आले आहेत, अशी माहिती अलिबागचे तहसीलदार सचिन शेजाळ यांनी लाेकमतशी बाेलताना दिली. जिल्हाधिकारी निधी चाैधरी यांच्या आदेशा नुसार सरकारी कार्यालये, आस्थापने यामधील कर्मचारी यांची काेराेना चाचणी करण्याचे निर्देश आहेत. 

 

त्यानुसार दाेन दिवसांपूर्वी अलिबाग येथील जिल्हा कारागृहातील 169 कैद्यांची काेराेना चाचणी करण्यात आली हाेती. त्यामध्ये तब्बल 69 केद्यांचे अहवाल पाॅझिटीव्ह आले. त्यानंतर तातडीने त्यांना अलिबाग-नेहुली क्रीडा संकुलातील काेविड केअर सेंटरमध्ये हलवण्यात आले. तेथे त्यांच्यावर तातडीने उपचार सुरु करण्यात आले आहेच. उर्वरित 100 कैद्यांचा काेराेना अहवाल नेगेटिव्ह आला. त्यांना कारागृहातच ठेवण्यात आल्याचे शेजाळ यांनी सांगितले.कारागृहात बाहेरुन भाजीपाला, किराणा तसेच कामानिमीत्त कर्मचारी बाहेर जातात. त्यांच्यामार्फत काेराेनाचा प्रसार झाला असण्याची शक्यताही शेजाळ यांनी व्यक्त केली.दरम्यान, 69 कैद्यांसह अलिबाग तालुक्यातील काेराेना बाधीतांचा आजचा आकडा हा 101 वर पाेचला आहे. 

आजअखेर अलिबाग तालुक्यात 17 हजार 356 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे.  पैकी 494 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.  15 हजार 653 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. सद्यस्थितीत तालुक्यातील 1 हजार 209 पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

Web Title: 69 prisoners infected with caries; Treatment started at Cavid Care Center at Nehuli Sports Complex

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.