जादूटोण्याच्या संशयावरून घर पेटवून केला प्राणघातक हल्ला, ७ आरोपींना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2022 07:46 PM2022-02-22T19:46:16+5:302022-02-22T19:47:20+5:30
Crime News : घटनेप्रकरणी तरोडा येथील सात जणांना पोफाळी पोलीसांनी अटक केली आहे.
यवतमाळ - उमरखेड तालुक्यातील तरोडा गावातील भोरे दाम्पत्यावर जादुटोणा करता म्हणून असा संशय घेवून सात जणांनी सामूहिकरीत्या जमवून घर पेटून दिले व त्यांना जीवे मारण्याचा पूरेपुर प्रयत्न झाला. ही घटना 20 फेब्रुवारी रविवार रोजी मध्यरात्रीच्या दरम्यान घडली. या घटनेप्रकरणी तरोडा येथील सात जणांना पोफाळी पोलीसांनी अटक केली आहे.
तरोडा गावात विनायक भोरे व त्यांची पत्नी उर्मिला भोरे हे दाम्पत्य घरीच असताना काही जन तोंडाला बांधून त्यांच्या घरात शिरले तुम्ही जादू टोणा करता म्हणून का जीवे मारण्यात येवू नये म्हणुन लाठया काठ्याने मारहाण केली व डिझेल/पेट्रोल टाकूण त्यांचे घर पेटून दिले. ही हृदयद्रावक घटना प्रथमच तालुक्यात तरोडा गावात घडली उर्मीला व विनायक ने मारेकऱ्यांच्या तावडीतुन कसे बसे सुटून आरडा ओरडा करूण घराबाहेर पडले. या घटनेत दोन्हीदांम्पत्यास मारहाण झाल्याने अत्यावस्थ झाले होते अश्या अवस्थेत जखमींच्या मुलाने घटनास्थळ गाठून प्रथम उपचार करून जवळच्या मुळावा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले प्रकुती अधिक चिंताजनक असल्याने उमरखेड येथील शासकीय उतवार रुग्णालयात आणले असता येथील डॉक्टर यांनी पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालय यवतमाळ या ठिकाणी उपचारासाठी पाठविण्यात आले विनायक भोरे यांची प्रकुती चिंताजनक असल्याने नागपूर येथील रुग्णालयात हलविण्यात आल्याची माहीती देण्यात आली.
उर्मीला हि बेशुद्ध अवस्थेतून बाहेर आल्या नंतर पोफाळी पोलीसाना घटणा क्रम कथन केला फिर्यादी उर्मीला भोरे (५०) रा तरोडा त्यांच्या जबानी फिर्यादी वरुण आरोपी समाधान बबन भुसारे वय 30 वर्ष , प्रफुल बबन भुसारे वय 21 वर्ष, आकाश भगवान धुळे वय 30 वर्ष, गोलु भगवान धुळे वय 25 वर्ष, भगवान गंगाराम धुळे वय 50 वर्ष, भीमराव गंगाराम धुळे वय 45 वर्ष, भास्कर लक्ष्मन हांडगे वय 29 वर्ष सर्व राहणार तरोडा गावातील असुन त्यांना भादवी कलम ४३६ , ३०७ , १४३ , १४४ , १४८, १४९, ४५२ , अन्वे अटक करण्यात आली आहे अशी माहीती पोफाळी चे ठाणेदार राजीव हाके यांनी दिली या घटनेत भोरे दांम्पत्याचे घर व मोटार सायकल जळूण खाक झाले आहे अधिक तपास पोलीस उप निरीक्षक राजेश पंडीत पोलीस कर्मचारी राम गडदे , किसन राठोड हे करीत आहे
आजच्या युगात जादुटोणासारख्या बाबी घडतात ही बाब समाजासाठी घातकच आहे. गावात किंवा परिसरात जादूटोणा होत असल्याचे किंवा करत असल्याची बाब लक्षात येताच नागरीकांनी कायदा हातात न घेता संबधित व्यक्तीसाठी समुपदेशन प्रक्रीयेचा मार्ग काढावा . नागरीकांनी अशा बाबीवर विश्वास ठेऊ नये. - दिलीप पाटील भुजबळ, पोलिस अधिक्षक