मुंबई, गोव्यात ७ ड्रग्ज तस्करांना अटक. शौविक चक्रवर्तीचे ड्रग चॅट उघड; बॉलीवूडमधील २० जणांची नावे समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2020 06:08 AM2020-09-03T06:08:49+5:302020-09-03T06:09:09+5:30

कपिल झव्हेरी, अब्बास लखानी, फैयाज अहमद, परवेझ खान उर्फ चिकू पठाण, बासित परिहार, झेंद विलात्रा व करण अरोरा अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. हे सर्व जण बॉलिवूड आणि पेज थ्री पार्ट्यांसाठी अमलीपदार्थ पुरवित असल्याचा अधिकाऱ्यांचा कयास आहे.

7 drug smugglers arrested in Mumbai, Goa Revealing drug chat of Shawvik Chakra behavior; In front of the names of 20 people in Bollywood | मुंबई, गोव्यात ७ ड्रग्ज तस्करांना अटक. शौविक चक्रवर्तीचे ड्रग चॅट उघड; बॉलीवूडमधील २० जणांची नावे समोर

मुंबई, गोव्यात ७ ड्रग्ज तस्करांना अटक. शौविक चक्रवर्तीचे ड्रग चॅट उघड; बॉलीवूडमधील २० जणांची नावे समोर

Next

मुंबई : अमलीपदार्थांची तस्करी व विक्री करणाऱ्या तस्करांविरुद्ध नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) कारवाईचा धडाका कायम ठेवत गेल्या दोन दिवसांत गोवा आणि मुंबईतून सात जणांना अटक केली. त्यांच्याकडून लाखो रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला आहे. या तस्करांचे बॉलीवूडशी कनेक्शन असून, गौरव आर्या आणि रिया चक्रवर्तीचा भाऊ शौविक हे त्यांच्या संपर्कात असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
कपिल झव्हेरी, अब्बास लखानी, फैयाज अहमद, परवेझ खान उर्फ चिकू पठाण, बासित परिहार, झेंद विलात्रा व करण अरोरा अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. हे सर्व जण बॉलिवूड आणि पेज थ्री पार्ट्यांसाठी अमलीपदार्थ पुरवित असल्याचा अधिकाऱ्यांचा कयास आहे.

सुशांतच्या आजाराबद्दल कुटुंबीयांना माहिती होती
सुशांतला नैराश्य आले होते. त्यासाठी औषधोपचार सुरू होते, याची त्याचे वडील आणि बहिणींना कल्पना होती, ही बाब त्यांच्यातील चॅटवरून स्पष्ट झाली आहे.

गौरव आर्या हा बासितच्या संपर्कात होता. ड्रग्जची डिलिव्हरी करण्याची जबाबदारी त्याच्यावर होती. शौविकही या तस्करांच्या संपर्कात होता. या तस्करांकडून ड्रग्ज खरेदी करणाºयांत बॉलीवूडमधील २० जणांची नावे समोर आली आहेत.

रणवीर, रणबीर, विकी, अयानने ड्रग्ज तपासणीसाठी रक्ताचे नमुने द्यावेत - कंगना
अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणानंतर बॉलीवूडमधील दिग्गजांवर आरोप-प्रत्यारोप करणाºया कंगना राणौतच्या नव्या ट्विटने पुन्हा खळबळ उडवली आहे.
बॉलिवूडमधील रणवीर सिंह, रणबीर कपूर, विकी कौशल, अयान मुखर्जी यांनी ड्रग्ज तपासणीसाठी रक्ताचे नमुने द्यावेत. अशी अफवा आहे की, तुम्ही सगळे कोकेनच्या आहारी गेला आहात. त्यामुळे माझी अशी इच्छा आहे की, तुम्ही या अफवा खोट्या ठरवाव्यात,’ असे म्हणत तिने हे ट्विट पीएमओला टॅग केले आहे.
 

Web Title: 7 drug smugglers arrested in Mumbai, Goa Revealing drug chat of Shawvik Chakra behavior; In front of the names of 20 people in Bollywood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.