७ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; देवेन भारतींच्या बदलीकडे सर्वांच्या नजरा 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2019 06:45 PM2019-03-12T18:45:51+5:302019-03-12T18:53:08+5:30

आता कायदा व सुव्यवस्थेचे देवेन भारती यांच्या बदलीकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत. 

7 IPS officers transfers; everybody's eyes on Deven bharti's transfer | ७ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; देवेन भारतींच्या बदलीकडे सर्वांच्या नजरा 

७ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; देवेन भारतींच्या बदलीकडे सर्वांच्या नजरा 

googlenewsNext
ठळक मुद्देनिवडणूकीच्या पार्श्वभूमीवर या बदल्या करण्यात आल्या आहेत. अपर पोलीस महासंचालक (नियोजन व समन्वय) धनंजय कमलाकर यांची धोरण विभागात नेमणूक करत, त्यांच्या जागी एस जगन्नाथन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मध्य प्रादेशिक विभागाचे रवींद्र शिसवे यांच्या खांद्यावर संरक्षण व सुरक्षा विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. 

मुंबई - राज्य पोलीस दलातील ३ अपर पोलीस महासंचालक तसेच मुंबई पोलीस दलातील ४ अपर पोलीस आयुक्तांची अंतर्गत बदली करण्यात आली आहे. गृहविभागाने मंगळवारी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर या बदल्या करण्यात आल्या आहेत. आता कायदा व सुव्यवस्थेचे देवेन भारती यांच्या बदलीकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत. 

अपर पोलीस महासंचालक (नियोजन व समन्वय) धनंजय कमलाकर यांची धोरण विभागात नियुक्ती करण्यात आली आहे. तर त्यांच्या जागी एस जगन्नाथन नियुक्ती करण्यात आली आहे. राजेंद्र सिंह यांच्याकडे राज्याच्या विशेष कृती दलाच्या अपर पोलीस महासंचालकपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. दक्षिण प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त प्रवीणकुमार पडवळ यांची वाहतूक विभागाच्या अपर पोलीस आयुक्तपदी नेमणूक करण्यात आली आहे. त्यांच्या जागी निशित मिश्रा दक्षिण प्रादेशिक विभागाचा कार्यभार सांभाळणार आहेत. तर वाहतूक विभागाचे विरेश प्रभू यांच्याकडे मध्य प्रादेशिक विभागाच्या अपर पोलीस आयुक्त पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मध्य प्रादेशिक विभागाचे रवींद्र शिसवे यांच्या खांद्यावर संरक्षण व सुरक्षा विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. 

अपर पोलीस महासंचालक (नियोजन व समन्वय) धनंजय कमलाकर यांची धोरण विभागात नेमणूक करत, त्यांच्या जागी एस जगन्नाथन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राजेंद्र सिंह यांच्याकडे राज्याच्या विशेष कृती दलाच्या अपर पोलीस महासंचालकपदी  नियुक्ती करण्यात आली आहे.

Web Title: 7 IPS officers transfers; everybody's eyes on Deven bharti's transfer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.