Video व्हायरल करण्याची धमकी देऊन तरुणीकडून उकळले 7 लाख; सोशल मीडियावर झालेली मैत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2023 02:42 PM2023-04-14T14:42:22+5:302023-04-14T14:50:45+5:30
तरुणाने नकळत तरुणीचा अश्लील व्हिडीओ बनवला आणि तो व्हायरल करण्याची धमकी देऊन तब्बल 7.12 लाख रुपये उकळले.
एका तरुणीला सोशल मीडियावरील मैत्री चांगलीच महागात पडली आहे. सोशल मीडियावर हाय-हॅलो, मग मैत्री, मग फोनवर इंटिमेट गॉसिप आणि व्हिडीओ कॉलिंग असा संवाद सुरू झाला. तरुणाने नकळत तरुणीचा अश्लील व्हिडीओ बनवला आणि तो व्हायरल करण्याची धमकी देऊन तब्बल 7.12 लाख रुपये उकळले. तरुणीला पैसे देता आले नसल्याने हा व्हिडीओ व्हायरल केला. पाकूरच्या नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी असलेल्या तरुणीने पोलिसांत धाव घेतली आहे. आरोपीवर कारवाई करण्याची मागणी केली.
तरुणीने पोलिसांना सांगितले की, बिहारच्या बांका जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या मनीष कुमारने दोन वर्षांपूर्वी सोशल मीडियावर तिच्याशी मैत्री केली. मैत्रीसाठी तो स्वत:ला मुस्लिम म्हणवून घेत असे. यादरम्यान त्याने माझी फसवणूक केली आणि माझा अश्लील व्हिडीओ बनवला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत पैशांची मागणी करू लागला. माझी इज्जत वाचवण्यासाठी मी त्याला बँक खात्यातून 7.12 लाख रुपये 7 हप्त्यांमध्ये दिले आहेत.
तरुणीने सांगितले की, तिने हे पती आणि घरच्यांना सांगितले नाही. मी भागलपूरलाही अनेक वेळा पैसे पाठवले आहेत. आता पैसे देऊ शकत नसल्याने आरोपी तरुणाने माझा व्हिडीओ व्हायरल केला. तिने आरोपीच्या कुटुंबीयांनाही या प्रकरणाची माहिती दिली. पण त्यांनीही मदत केली नाही आणि मनीषच्या वागण्यात काही बदल झाला नाही. मनीषच्या आई आणि बहिणीने तर मनीष आणि पैसे दोन्ही विसरून जा असे सांगितले.
शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी मनोज कुमार यांनी सांगितले की, या लोकांमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून मैत्री झाली होती. तरुणाने व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन महिलेकडून 7.12 लाख रुपये घेतल्याचे महिलेचे म्हणणे आहे. आरोपी तरुणाच्या आई आणि बहिणीचाही यात समावेश आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करून पोलीस विविध पैलूंचा तपास करत आहेत. लवकरच प्रकरण उघड होईल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"