बंदुकीचा धाक दाखवून ७ लाख लंपास; नांदेडमधील गोकुळनगर भागातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2021 11:44 PM2021-08-11T23:44:35+5:302021-08-11T23:45:12+5:30
अग्रवाल यांच्याकडे पाच नोकर कामाला आहेत. त्यातील एक सुट्टीवर होता.
नांदेड- नांदेड शहर व जिल्ह्यात लुटमारीच्या घटना सातत्याने घडत आहेत. बुधवारी रात्री साडे सात वाजेच्या सुमारास मुख्य वस्ती असलेल्या गोकुळ नगर भागात सिमेंट चा व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्याचे बंदुकीचा धाक दाखवून सात लाख रुपये लंपास करण्यात आले. घटनेतील चार आरोपी सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहेत. गोकुळ नगर भागात पूर्णा येथील हनुमान अग्रवाल यांची बालाजी ट्रेडिंग कंपनी नावाने सिमेंट विक्रीची दुकान आहे.
अग्रवाल यांच्याकडे पाच नोकर कामाला आहेत. त्यातील एक सुट्टीवर होता. तर इतर तिघे रात्री साडे सात वाजता दुकानात होते. तर एक नोकर काही वेळापूर्वी दुकानातून निघून गेला होता. त्याचवेळी दोन आरोपी दुकानात शिरले. त्यांनी नोकरांना बंदूक अन चाकुचा धाक दाखवून सात लाख रुपये असलेली बॅग हिसकावून घेतली. काही वेळातच एका दुचाकी वरून चार आरोपी पसार झाले.ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले.
या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती. घटनास्थळी सपोनि पांडुरंग भारती यांनी धाव घेतली. त्यांनी नोकरकडून सर्व माहिती घेतली. चौकट नोकरांची पोलिस विचारपूस करीत असताना अनेक बाबी उघड झाल्या. नेमके आजच दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद होते. दुरुस्ती साठी ते बंद ठेवण्यात आल्याची माहिती मिळाली