पाळणाघरातच ७ वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; पोलिसांनी आरोपीला केली अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2021 04:24 PM2021-05-24T16:24:43+5:302021-05-24T16:44:11+5:30
Sexually abused 7 years old girl : पोलिसांनी पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केले आहे.
नालासोपाऱ्यात राहणारी २८ वर्षीय महिला आपली ७ वर्षाची चिमुकली आरोपी प्रसाद पाते याच्याकडे असलेल्या पाळणाघरमध्ये सांभाळण्याकरिता ठेवायची. आरोपीने ६ एप्रिल ते १७ मे दरम्यान लैंगिक अत्याचार केला. पीडित मुलीच्या आईने नालासोपारा पोलीस ठाण्यात बुधवारी तक्रार दिली. पोलिसांनी पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केले आहे.
मात्र,पाळणाघरातील चिमुकलीवर लैंगीक अत्याचार झाल्याची घटनेने खळबळ माजली आहे. आईच्या तक्रारीवरुन पाळणाघर चालवणाऱ्या महिलेच्या पतीला पोलिसांनीअटक केली आहे. त्याच्यावर पॉक्सोअंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. अत्यावश्यक सेवेत काम करणारी महिला आपल्या ७ वर्षाच्या चिमुरडीला नालासोपाऱ्यातील पाळणाघरात सोडून कामावर जात होती. पाळणाघर चालवणाऱ्या महिलेचा पती त्या चिमुरडीवर मागील दीड महिन्यापासून लैंगिक अत्याचार करत होता. ही बाब जेव्हा चिमुकलीच्या आईला माहिती झाली, तेव्हा तिने नालासोपारा पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात तक्रार नोंदवली. पोलिसांनी आरोपी विरोधात पॉक्सोअंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल करुन, आरोपीला तात्काळ अटक केली आहे.
कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर; दोन तरुण मुलांच्या निधनानंतर पित्याचाही झाला मृत्यू https://t.co/3duAj7RJi1
— Lokmat (@MiLOKMAT) May 24, 2021
या पाळणाघरात किती मुली बेबी सिटींगसाठी आल्या होत्या आणि आता किती आहेत? याबाबत त्यांच्या काही तक्रारी आहेत का याबाबत आता पोलीस तपास करणार आहेत.