७० किलो एमडी जप्त, पोलिसांची कारवाई; आंतरराज्यस्तरीय रॅकेटमध्ये मुख्य पुरवठादाराला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2021 07:09 AM2021-10-17T07:09:41+5:302021-10-17T07:09:55+5:30

आतापर्यंत एकूण ३६ आंतर राज्यस्तरीय तस्करांना अटक

70 kg MD seized by mumbai police | ७० किलो एमडी जप्त, पोलिसांची कारवाई; आंतरराज्यस्तरीय रॅकेटमध्ये मुख्य पुरवठादाराला अटक

७० किलो एमडी जप्त, पोलिसांची कारवाई; आंतरराज्यस्तरीय रॅकेटमध्ये मुख्य पुरवठादाराला अटक

googlenewsNext

मुंबई :  ड्रग्जच्या आंतरराज्यस्तरीय रॅकेटमध्ये मुख्य पुरवठादाराला मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी कक्ष (एएनसी) मध्य प्रदेशातून अटक केली आहे. शोएब आयुब सिकरावा (रा. श्यामगढ ,मध्यप्रदेश) असे त्याचे नाव असून,  त्याच्याकडून मुंबईसह पूर्ण, मध्यप्रदेश, कर्नाटक, दिल्ली व अन्य राज्यात हेरॉइन व मेफोडीन (एमडी) वितरित केल्याचे तपासातून स्पष्ट झाले आहे. 

एएनसीच्या वांद्रे कक्षाने ही कारवाई करताना त्याच्याकडील ७० किलो एमडी जप्त केले आहे. सिकरवाचे वडील आयुब कल्लू  शाह सिकरावा हा मुख्य आरोपी असून, त्याचाही शोध घेण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. आतापर्यंत याप्रकरणी एकूण ३६ आंतर राज्यस्तरीय तस्करांना अटक केली आहे. 
वांद्रे कक्षाने गेल्या वर्षी  ३० जूनला संजीव निमाई सरकार ऊर्फ राजा सरकार (वय ३९,रा.साफल्य बिल्डिंग,चौथा मजला, रूम न.४०३, न्यू लिंक रोड, गोरेगाव पश्चिम), सलीम अकबर खान ऊर्फ सलमान (४१ रा. रूम न.३५,गेट क्र.६, मालाड पश्चिम) यांना अटक केली होती. 

त्यांच्याकडून ३.४० कोटीचे १.८० किलो हेरॉइन व १.१०० किलो २.२० कोटीचे  एमडी जप्त केले होते. त्याच्याकडून केलेल्या चौकशीतून  अन्य आरोपींना अटक करण्यात येत आहे.

मुंबई : कार्डेलिया क्रूझवरील ड्रग्ज पार्टीवर केलेल्या कारवाईबद्दल उलटसुलट चर्चा सुरू असली, तरी एनसीबीने ड्रग्जविरोधात कारवाई सुरू ठेवली आहे. नालासोपारा व पालघर या ठिकाणी शुक्रवारी छापे मारून ५०५ ग्रॅम एमडी जप्त केले. त्याची अमली बाजारपेठेतील किंमत सुमारे एक कोटी असल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी मोहम्मद अजाज याकूब शेख, (रा.इमाम रोड, डोंगरी) याला अटक करण्यात आली आहे.
 एका नायजेरियन नागरिकाने मुंबईतील व्यक्तीला एमडी उर्फ म्याव म्याव वितरित केले असल्याची माहिती एनसीबीच्या मुंबई पथकाला मिळाली. त्यानुसार, वसई (पूर्व) येथील राष्ट्रीय महामार्ग, चिंचोटी फाटा येथे छापा मारून २०५ ग्रॅम एमडी जप्त केले. 
या प्रकरणी मोहम्मद अजाज याला अटक करण्यात आली असून, त्याने दिलेल्या माहितीवरून नालासोपारा येथे एका ठिकाणी लपविलेले ३०० ग्रॅम एमडी जप्त केले आहे. मोहम्मद अजाज हा हे एमडी मुंबई शहर व उपनगरात विविध ठिकाणी पुरविणार होता, त्याच्याकडे अधिक तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title: 70 kg MD seized by mumbai police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.