७० मिनिटं, २१ साखळी बॉम्बस्फोट, ५६ मृत्यू; १३ वर्षांनी अहमदाबाद ब्लास्टप्रकरणी आला महत्वपूर्ण निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2022 08:47 PM2022-02-08T20:47:39+5:302022-02-08T20:48:27+5:30

Ahmedabad serial bomb blast decision : हा निकाल २ फेब्रुवारी रोजीच लावला जाणार होता. मात्र अचानक विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एआर पटेल यांना कोरोना विषाणूची लागण झाली. त्यामुळे हा निकाल लांबणीवर पडला.

70 minutes, 21 serial bomb blast, 56 deaths; Important decision in Ahmedabad serial bomb blast case after 13 years | ७० मिनिटं, २१ साखळी बॉम्बस्फोट, ५६ मृत्यू; १३ वर्षांनी अहमदाबाद ब्लास्टप्रकरणी आला महत्वपूर्ण निर्णय

७० मिनिटं, २१ साखळी बॉम्बस्फोट, ५६ मृत्यू; १३ वर्षांनी अहमदाबाद ब्लास्टप्रकरणी आला महत्वपूर्ण निर्णय

Next

२००८ साली अहमदाबाद शहर अवघ्या एक तासात तब्बल २१ ठिकाणी साखळी बॉम्बस्फोटाने हादरले होते. या प्रकरणी गुजरात न्यायालयाने ७७ पैकी ४९ आरोपींना दोषी ठरवलं आहे. तर २८ जणांची निर्दोष सुटका केली आहे. उद्या गुजरात न्यायालयाकडून ४९ दोषींना शिक्षा सुनावली जाणार आहे. हा निकाल २ फेब्रुवारी रोजीच लावला जाणार होता. मात्र अचानक विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एआर पटेल यांना कोरोना विषाणूची लागण झाली. त्यामुळे हा निकाल लांबणीवर पडला.

हा साखळी बॉम्बस्फोट २६ जुलै २००८ रोजी घडला होता. यादिवशी अहमदाबाद नगर पालिका क्षेत्रातील तब्बल २१ ठिकाणी बॉम्बस्फोट घडवण्यात आले होते. हे सर्व बॉम्बस्फोट केवळ एका तासात घडले होते. या स्फोटानं संपूर्ण देश हादरला होता. या हल्ल्यात ५६ निष्पाप नागरिकांचा जीव गेला होता. तर २०० हून अधिक जण जखमी झाले होते. या घटनेनंतर दुसऱ्याच दिवशी अहमदाबादमध्ये २० तर सुरतमध्ये १५ गुन्हे दाखल केले होते. संबंधित गुन्ह्यातील सर्व आरोपी एकाच कटाचा भाग असल्याने सर्व गुन्हे एकत्रित करून एकच खटला भरवण्यात आला होता.

अहमदाबाद बॉम्बस्फोट टाइमलाइन


• गोध्राकांडनंतर झालेल्या दंगलीचा बदला घेण्याचा कट होता

• वाघमोर जंगलात स्फोटासाठी प्रशिक्षित

• दहशतवाद्यांचे एक पथक रेल्वेने अहमदाबादला पोहोचले

• मुंबईहून कारमध्ये स्फोटके आणली होती

• कारने अहमदाबाद आणि सुरतपर्यंत स्फोट झाले

• 13 सायकल खरेदी केल्या आणि स्थानिक स्लीपर सेल वापरले

• मुफ्ती अबू बशीर यांनी स्लीपर सेल तयार केला होता

• ८२ दहशतवाद्यांना पकडण्यात आले

• ३ दहशतवादी पाकिस्तानात पळून गेले

• ३ दहशतवादी वेगवेगळ्या राज्यात शिक्षा भोगत आहेत

• १ आरोपी सीरियाला पळून गेला

• चकमकीत १ आरोपी मारला गेला

या साखळी बॉम्बस्फोटाच्या घटनेनंतर तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी अहमदाबादला भेट दिली होती. या भेटीनंतर २८ जुलै रोजी गुजरात पोलिसांचे एक विशेष पथक तयार करण्यात आले होते. या पोलीस पथकाने अवघ्या १९ दिवसांत ३० दहशतवाद्यांना अटक केली होती. त्यानंतर उर्वरित दहशतवाद्यांना मिळत गेलेल्या माहितीनुसार अटक करण्यात आली. अहमदाबादमधील साखळी बॉम्बस्फोटांपूर्वी इंडियन मुजाहिदीनच्या (IM) दहशतवाद्यांनी जयपूर आणि वाराणसीमध्ये देखील बॉम्बस्फोट घडवून आणला होता. त्यामुळे देशभरातील अनेक राज्यांचे पोलीस त्यांच्या शोधात होते.

अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोटाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच २७ जुलैला सूरतमध्ये देखील बॉम्बस्फोट घडवण्याचा कट आखला होता. मात्र, टायमरमध्ये बिघाड झाल्यामुळे  स्फोट होऊ शकले नाहीत. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत तब्बल ७७ जणांना अटक केली होती. त्यापैकी ४९ जणांना गुजरात न्यायालयाने दोषी ठरवलं आहे. तर २८ जणांची निर्दोष मुक्तता केली आहे. या प्रकरणी दोषी आरोपींना उद्या शिक्षा सुनावली जाणार आहे.

 

 

Web Title: 70 minutes, 21 serial bomb blast, 56 deaths; Important decision in Ahmedabad serial bomb blast case after 13 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.