मनोरुग्ण असलेल्या ७० वर्षीय व्यक्तीने स्वत:ला घेतलं पेटवून; झाला दुर्दैवी अंत
By काशिराम म्हांबरे | Updated: February 9, 2024 17:03 IST2024-02-09T17:03:03+5:302024-02-09T17:03:32+5:30
शुक्रवारी सकाळी १०.३० च्या दरम्यान घडली घटना

मनोरुग्ण असलेल्या ७० वर्षीय व्यक्तीने स्वत:ला घेतलं पेटवून; झाला दुर्दैवी अंत
काशिराम म्हांबरे, लोकमत न्यूज नेटवर्क, म्हापसा: मनोरुग्ण असलेल्या कारोणा-हळदोणा येथील रमेश बांदोडकर ( वय ७०) या वृद्ध इसमानेस्वताला पेटवून घेऊन आत्महत्या केली. घटना आज शुक्रवारी सकाळी १०.३० च्या दरम्यान घडली.
बांदोडकर हे मानसिक रुग्ण असल्याने त्याची राहण्याची स्वतंत्र अशी व्यवस्था त्याच्या घराला लागून असलेल्या एक खोलीत कुटुंबियांकडून करण्यात आली होती. त्यात ते राहत होते. त्याच खोलीत त्यांनी पलंगावर स्वतःला पेटवून घेतले.
त्यातच त्याचा होरपळून मृत्यू झाला. कुटुंबातील एक सदस्य सकाळी त्याला चहा तसेच नाष्टा घेऊन खोलीत गेला असता घडलेला प्रकार त्याच्या निदर्शनास आला. त्या सदस्याने लागलीच कुटुंबियांना त्याची माहिती दिली. नंतर पोलिसांना आणि अग्नी शमन दलाला प्राचारण करण्यात आले. म्हापसा पोलिसांनी पंचनामा करून त्याचा मृतदेह ताब्यात घेऊन गोवा वैद्यकिय महाविद्यालयात पाठवला आहे. तसेच अनैसर्गिक म्हणून घटनेची नोंद केली आहे. पुढील तपास कार्य सुरु करण्यात आले आहे.