मुंबईत जोडप्याने केली ७० वर्षीय वृद्धाची हत्या; कारण ऐकून कुणालाही विश्वास बसला नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2022 12:48 PM2022-01-04T12:48:07+5:302022-01-04T12:48:19+5:30

स्थानिक रहिवाशांनी एका वृद्धाचा मृतदेह रोडवर पडलेल्या अवस्थेत पाहिल्यानंतर त्यांनी मानखुर्द पोलिसांना माहिती दिली.

70-year-old murdered by couple in Mumbai; Police Arrested Accused | मुंबईत जोडप्याने केली ७० वर्षीय वृद्धाची हत्या; कारण ऐकून कुणालाही विश्वास बसला नाही

मुंबईत जोडप्याने केली ७० वर्षीय वृद्धाची हत्या; कारण ऐकून कुणालाही विश्वास बसला नाही

Next

मुंबई – कुर्ला येथील गोवंडी मानखुर्द परिसरात एका ७० वर्षीय वृद्ध नोकराची निर्दयी हत्या करण्यात आली आहे. या हत्येचा उलगडा पोलिसांनी केला असून आरोपी दाम्पत्याने लाकडाच्या काठीने मारहाण करुन वृद्धाची हत्या केली. मुंबई पोलिसांनी आरोपी पती-पत्नीला अटक करून जेलमध्ये पाठवलं आहे. परंतु नेमकी ही हत्या का करण्यात आली? याचा शोध घेताना पोलिसांसमोर आरोपींनी धक्कादायक कबुली दिली आहे.

आरोपी पती-पत्नीला संशय आल्याने त्यांनी वृद्ध नोकराची हत्या केली. या जोडप्याला एक अल्पवयीन मुलगी असून वृद्ध नोकर तिच्याशी चुकीची वर्तवणूक करत असल्याचा संशय दोघांना होता. त्यामुळे रागाच्या भरात दोघांनी नोकराला इतकी बेदम मारहाण केली की त्याचा मृत्यू झाला. हत्येनंतर दोन्ही आरोपी जोडप्यांनी मृतदेह निर्जनस्थळी फेकण्यासाठी घेऊन गेले. स्थानिक लोकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी मृतदेह पोस्टमोर्टमसाठी पाठवला. या वृद्ध नोकराच्या शरीरातील अनेक हाडे मोडल्याचा खुलासा पोस्टमोर्टम रिपोर्टमधून झाला आहे.

स्थानिक रहिवाशांनी एका वृद्धाचा मृतदेह रोडवर पडलेल्या अवस्थेत पाहिल्यानंतर त्यांनी मानखुर्द पोलिसांना माहिती दिली. पोलिसांच्या माहितीनुसार, मृत व्यक्तीचं नाव मोहम्मद इस्मत असं आहे. या प्रकरणात FIR नोंद करत पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. तेव्हा आरोपीच्या शोधासाठी पोलिसांनी ५ पथकं तयार केली. यातील पहिलं पथक आरोपीच्या घरी पोहचले तेव्हा पती-पत्नी मुलीसह फरार झाले होते.

आरोपी जोडपे पटना जाण्यासाठी घरातून पसार झाले. पोलिसांच्या आयटी सर्विलांस आणि अन्य सोर्सने आरोपी पती आणि पत्नी यांचे शेवटचं लोकेशन चेंबूरला असल्याचं शोधलं त्यानंतर त्याठिकाणी जात पोलिसांनी आरोपींना बेड्या ठोकल्या. दोन्ही आरोपींनी हत्येची कबुली दिली असून ज्या वृद्धाची हत्या केली तो आमच्या मुलीशी अश्लिल वर्तवणूक करायचा असा दावा पकडलेल्या आरोपींनी केला आहे.

पोलीस झाले हैराण  

पोलिसांनी या प्रकरणात शेजाऱ्यांची चौकशी केली असता वृद्ध नोकराविरोधात असे काहीही पुरावे सापडले नाहीत. मात्र ज्या निर्दयीपणाने मारहाण करत वृद्धाची हत्या करण्यात आली. ते पाहून पोलीस हैराण झाले. जर मुलीसोबत गैरवर्तवणूक होत असेल तर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवायला हवी होती. मात्र जोडप्याने असं काही केले नाही. मात्र या प्रकरणाची चर्चा मानखुर्द परिसरात सुरु आहे.

Web Title: 70-year-old murdered by couple in Mumbai; Police Arrested Accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.