'जसं सांगत आहे तसं कर...', अश्लील व्हिडीओ कॉल करून पोलीसवाल्याकडून घेतले 75 हजार रूपये
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2022 03:28 PM2022-07-19T15:28:40+5:302022-07-19T15:29:04+5:30
Uttar Pradesh : कॉन्स्टेबल भानु प्रताप यांनी सांगितलं की, 10 जुलैला त्यांना Whatsapp वर कॉल आला होता. जसा त्यांनी मेसेज पाहिला, त्याला व्हिडीओ कॉल आला. जसा त्याने व्हिडीओ कॉल रिसीव्ह केला तो हैराण झाला.
उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) बांदामध्ये काही लोकांनी पोलीस कॉन्स्टेबलला व्हिडीओ कॉल केला आणि त्याचा MMS बनवून ब्लॅकमेल केलं गेलं. नंतर तुरूंगात टाकण्याची धमकी देत त्याच्याकडून 75 हजार रूपये बॅंक अकाउंटमध्ये ट्रान्सफर करून घेतले. त्यानंतर वैतागून कॉन्स्टेबल भानु प्रतापने पोलिसात तक्रार दाखल केली. ज्यानंतर ASP ने या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले. ते म्हणाले की, असा प्रकार करणाऱ्यांना सोडलं जाणार नाही. सध्या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.
कॉन्स्टेबल भानु प्रताप यांनी सांगितलं की, 10 जुलैला त्यांना Whatsapp वर कॉल आला होता. जसा त्यांनी मेसेज पाहिला, त्याला व्हिडीओ कॉल आला. जसा त्याने व्हिडीओ कॉल रिसीव्ह केला तो हैराण झाला. व्हिडीओ कॉलमध्ये एक तरूणी तिचे कपडे काढून अश्लील हावभाव करत होती. नंतर तरूणीने त्याला बाथरूमध्ये जाण्यास सांगितलं. मग म्हणाली की, जसं सांगत आहे तसं कर. मग कॉन्स्टेबलने तरूणीला रागावलं आणि सांगितलं की, मी विवाहित आहेत आणि मला दोन मुलं आहेत. मी हे काही करणार नाही.
तरूणी म्हणाली की, ती रात्री 9 वाजता पुन्हा कॉल करेल. जसा 9 वाजता तिचा कॉल आला तर कॉन्स्टेबलने उचलला नाही. यावर तिने Whatsapp वर त्याला पहिला व्हिडीओ कॉलचा व्हिडीओ पाठवला. जो अश्लील होता. मग धमकी देत ती म्हणाली की, आम्ही तुला सोडणार नाही. यानंतर 12 जुलैला क्राइम ब्रॅन्च इन्स्पेक्टर नोएडाचं नाव सांगत कॉन्स्टेबलला फोन आला. त्याला सांगण्यात आलं की, कुणीतरी त्याच्याविरोधात छेडछाडीची तक्रार दाखल केली आहे.
कॉन्स्टेबलने सांगितलं की, त्याने असं काही केलं नाही. तो व्हिडीओ चुकीच्या पद्धतीने बनवण्यात आला आहे. यावर कॉन्स्टेबलला सांगण्यात आलं की, त्याने यूट्यूब चॅनलसोबत बोलावं. तेव्हाच व्हिडीओ डिलीट होईल. कॉन्स्टेबलने त्यांच्याद्वारे सांगण्यात आलेल्या नंबरवर फोन केला तर 75 हजार रूपयांची मागणी करण्यात आली. कॉन्स्टेबलनेही काही न विचार करता पैसा पाठवले. पण नंतर त्याला पुन्हा ब्लॅकमेलिंगचे फोन येऊ लागले होते. त्यानंतर हे प्रकरण उघड झालं. कॉन्स्टेबलने तक्रार दाखल केली असून चौकशी सुरू आहे.