५० रुपयांच्या नादात गमावले ८.५ लाख, YouTube व्हिडीओचं एक लाईक पडलं भारी, नक्की काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2023 10:02 AM2023-04-03T10:02:02+5:302023-04-03T10:03:14+5:30

प्रत्येक लाईकसाठी तुम्हाला ५० रुपये मिळतील अशी ऑफर जवळपास प्रत्येक सोशल मीडिया युझरनं पाहिली असेल.

8 5 lakh lost in the sound of 50 rupees one like YouTube video fell heavily what exactly happened crime news | ५० रुपयांच्या नादात गमावले ८.५ लाख, YouTube व्हिडीओचं एक लाईक पडलं भारी, नक्की काय घडलं?

५० रुपयांच्या नादात गमावले ८.५ लाख, YouTube व्हिडीओचं एक लाईक पडलं भारी, नक्की काय घडलं?

googlenewsNext

YouTube Scam:  प्रत्येक लाईकसाठी तुम्हाला ५० रुपये मिळतील अशी ऑफर जवळपास प्रत्येक सोशल मीडिया युझरनं पाहिली असेल. अशा परिस्थितीत, काही लोक या ऑफरच्या जाळ्यात अडकले असतील, काही लोकांनी त्याकडे दुर्लक्षही केलं असेल. आजकाल अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवून ऑनलाइन पेमेंट करून लाखो रुपये गमावण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. गेल्या काही महिन्यांत अनेक प्रकरणं समोर आली आहेत. रिपोर्ट्सनुसार, नुकतंच एक प्रकरण समोर आलं आहे ज्यात गुरुग्राममध्ये राहणाऱ्या एका यूजरची ८.५ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आलीये. दरम्यान, व्हिडीओला लाईक करण्यासाठी प्रत्येकी ५० रुपये दिले जातील असं ठगांनी सांगितलं.

गमावले ८.५ लाख
पीटीआयच्या रिपोर्टनुसार, गुरुग्राममध्ये राहणाऱ्या एका युजरला स्कॅमर्सनी काही YouTube व्हिडीओ लाईक करून पैसे कमवण्याचं आमिष दाखवलं आणि त्या व्यक्तीनं तब्बल आपले ८.५ लाख रुपये गमावले. रिपोर्टनुसार ठगांनी त्या व्यक्तीशी संपर्क साधला आणि युट्यूब व्हिडीओच्या प्रत्येक लाईकसाठी ५० रुपये दिले जातील असं म्हटलं. अशा परिस्थितीत ठगानं व्हॉट्सअॅप मेसेजद्वारे पीडितेशी संपर्क साधला होता. यामध्ये गुंतवणुकीच्या संधीबाबत चर्चा झाली. अशातच संबंधित व्यक्तीनं टेलिग्रामच्या माध्यमातून काही लोकांना हा मेसेज दिला. यामध्ये काही यूट्यूब व्हिडीओवर प्रत्येक लाईकसाठी ५० रुपये मिळावेत असा प्रारंभिक प्रस्ताव होता.

तीन दिवसांत तीन वेळा ट्रान्झॅक्शन
दरम्यान, ठगांनी मर्चंट टास्कसाठी पैशांच्या ट्रान्झॅक्शनची रिक्वेस्ट दिली होती. यात अडकून संबंधित व्यक्तीनं २७,२८,२९ आणि ३० मार्च रोजी निरनिराळ्या ट्रान्झॅक्शन्सद्वारे साडेआठ लाख रुपये ट्रान्सफर केल्यानं तक्रारीत नमूद करण्यात आलंय.

Web Title: 8 5 lakh lost in the sound of 50 rupees one like YouTube video fell heavily what exactly happened crime news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.