आमगाव-लांजी मार्गावरील सीमा तपासणी नाक्यावर ८ किलो सोने जप्त; गोंदियातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2024 08:50 AM2024-10-21T08:50:20+5:302024-10-21T08:50:43+5:30

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या नाक्यावर आमगाव मतदारसंघातील भरारी आणि एसएसटी पथक तैनात आहे.

8 kg gold seized at border check post on Amgaon-Lanji road; Incident in Gondia | आमगाव-लांजी मार्गावरील सीमा तपासणी नाक्यावर ८ किलो सोने जप्त; गोंदियातील घटना

आमगाव-लांजी मार्गावरील सीमा तपासणी नाक्यावर ८ किलो सोने जप्त; गोंदियातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क, आमगाव (जि. गोंदिया): आमगाव-लांजी मार्गावरील सीमा तपासणी नाक्यावर एका लॉजिस्टिक वाहनाची तपासणी भरारी व एसएसटी पथकाने केली असता त्यात ३ कोटी ९१ लाख रुपये किमतीचे ७ किलो ८९२ ग्रॅम सोने आढळले. पथकाने हे सोने व वाहन जप्त केले आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या नाक्यावर आमगाव मतदारसंघातील भरारी आणि एसएसटी पथक तैनात आहे. शनिवारी रात्री नाक्यावर तैनात अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आमगाववरून शिवणीकडे जात असलेले लॉजिस्टिक वाहन थांबवून तपासणी केली. तपासणीदरम्यान या वाहनातून ३ कोटी ९१ लाख किमतीचे सोने सापडले. वाहनचालकाच्या संशयास्पद हालचालीवरून कर्मचाऱ्यांनी याची माहिती उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व आमगाव पोलिस स्टेशनचे ठाणेदार यांना दिली. माहिती मिळताच ते नाक्यावर पोहोचले. या सर्वांच्या उपस्थितीत पंचनामा करून जप्त केलेला मुद्देमाल सीलबंद करण्यात आला.

Web Title: 8 kg gold seized at border check post on Amgaon-Lanji road; Incident in Gondia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Goldसोनं