ऑनलाईन पैसे लावून फायदा देण्याची आमिष दाखवून महिलेची ८ लाखांना फसवणूक

By धीरज परब | Published: July 6, 2023 05:26 PM2023-07-06T17:26:25+5:302023-07-06T17:26:42+5:30

मीरा पुरन असे नाव सांगणाऱ्या अनोळखी महिलेने व्हॉट्सअप करून गुगलवर हॉटेल ना स्टार व रिव्ह्यू देण्याचे काम आहे व प्रत्येक रिव्ह्यूला ५० रुपये मिळणार असल्याचे सांगितले .  

8 lakh fraud of a woman by pretending to give benefits by investing money online | ऑनलाईन पैसे लावून फायदा देण्याची आमिष दाखवून महिलेची ८ लाखांना फसवणूक

ऑनलाईन पैसे लावून फायदा देण्याची आमिष दाखवून महिलेची ८ लाखांना फसवणूक

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क 

मीरारोड - मीरारोड मधील एक महिलेस वर्क फ्रॉम होम चे सांगून नंतर  ऑनलाईन पैसे लावल्यास चांगला फायदा मिळेल असे आमिष दाखवून सायबर लुटारूंनी तिची ७ लाख ९५ हजारांना फसवणूक केली आहे . 

काशीमीराच्या ठाकूर मॉल समोर लोढा कासा मध्ये जिग्ना मेहता (४७ ) ह्या त्यांच्या वृद्ध आई सह राहतात . आईची देखभाल करण्यासाठी म्हणून नोकरी सोडून त्या घरीच असतात . मीरा पुरन असे नाव सांगणाऱ्या अनोळखी महिलेने व्हॉट्सअप करून गुगलवर हॉटेल ना स्टार व रिव्ह्यू देण्याचे काम आहे व प्रत्येक रिव्ह्यूला ५० रुपये मिळणार असल्याचे सांगितले .  

घरातूनच काम असल्याने जिग्ना यांनी होकार दर्शवत कामास सुरवात केली व पहिल्याच वेळी ६०० रुपये त्यांच्या बँक खात्यात आले .  नंतर त्यांना टेलिग्राम ग्रुप जॉईंट करायला सांगून कॉईन३२२.वन या साईट वर जाण्यास सांगितले . तेथे पैसे लावल्यास चांगला फायदा मिळेल असे आमिष दाखवले . जिग्ना यांनी २ हजार भारताच त्यांना २८०० रुपये आले. त्यामुळे बक्कळ फायद्याच्या आमिषाने जिग्ना यांनी त्या साईटवर पैसे भरण्यास सुरवात केली . 

जिग्ना यांनी तिच्या स्वतः कडचे तसेच मैत्रिणीकडून उसने घेऊन ७ लाख ९५ हजार भरले . त्या टेलिग्राम ग्रुप मध्ये चौघेजण होते व प्रत्येकाला होणारा नफा त्यात दाखवला जात होता  . त्यांनी पैसे मागितले असता तुमचा खेळण्याचा स्कोर ७० टक्केच झाला असून १०० टक्के तो झाल्यानंतर पैसे मिळतील असे सांगून जिग्ना यांची अडवणूक सुरु केली . 

त्यांनी ई कॉमर्स वर या बाबत चौकशी केली असता अश्या प्रकारे खोट्या कंपन्या आणि फायद्याचे आमिष दाखवून लोकांची फसवणूक केली जात असल्याचे त्यांना सांगण्यात आले . आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांच्या फिर्यादी वरून काशीमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पोलीस पुढील तपास करत आहेत . 

Web Title: 8 lakh fraud of a woman by pretending to give benefits by investing money online

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.