रेल्वेत नोकरी व सुनेच्या बदलीच्या कारणाने महिलेची ८ लाखांची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2019 18:50 IST2019-09-17T18:48:55+5:302019-09-17T18:50:51+5:30
मुलाला व जावयाला रेल्वेत नोकरी लावतो तसेच त्यांच्या सुनेची बदली करतो असे म्हणत आरोपीने एकूण ८ लाख २० हजार रुपये घेऊन फसवणूक केली आहे.

रेल्वेत नोकरी व सुनेच्या बदलीच्या कारणाने महिलेची ८ लाखांची फसवणूक
देहूरोड : विकासनगर येथील एका महिलेच्या मुलास व जावयास रेल्वेत नोकरी लावतो तसेच सुनेची बदली करतो, असे म्हणून फिर्यादी महिला व त्यांच्या जावयाकडून ८ लाख २० हजार रुपये घेऊन त्यांची फसवणूक केली आहे. हा प्रकार मार्च २०१७ ते २७ जून २०१७ तसेच ११ ऑगस्ट २०१७ ला घडला असून पोलिसांनी एका इसमाविरुद्ध सोमवारी रात्री उशिरा फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. अद्याप संबंधितास अटक करण्यात आलेली नाही.
याबाबत राधा शिवाजी भंडारे( वय ६०, रा. विकासनगर, किवळे,पुणे ) यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी तुषार बाळकृष्ण भिसे( रा. वाल्हेकरवाडी, पुणे ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राधा भंडारे यांचे मुलाला व जावयाला रेल्वेत नोकरी लावतो तसेच त्यांच्या सुनेची बदली करतो असे म्हणत भंडारे यांच्याकडून व त्यांच्या जावयाकडून आरोपी तुषार भिसे याने एकूण ८ लाख २० हजार रुपये घेऊन फसवणूक केली आहे. अधिक तपास देहूरोड पोलीस करीत आहेत.