भयंकर! नववीत शिकणाऱ्या मुलीवर 8 जणांकडून 13 दिवस बलात्कार; 6 आरोपी अल्पवयीन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2020 11:57 AM2020-12-09T11:57:45+5:302020-12-09T12:01:48+5:30
Crime And Rape News : धक्कादायक बाब म्हणजे चौकशीदरम्यान आरोपींपैकी 6 जण अल्पवयीन असल्याची माहिती समोर आली आहे.
नवी दिल्ली - देश सध्या कोरोनाच्या संकटाचा सामना करत असताना अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. अशीच एक घटना बलरामपूरमध्ये घडली आहे. इयत्ता नववीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीवर 8 जणांनी तब्बल 13 दिवस बलात्कार केल्याचा भयंकर प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ माजली आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे चौकशीदरम्यान, आरोपींपैकी 6 जण अल्पवयीन असल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, छत्तीसगडमधील बलरामपूर जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इयत्ता नववीमध्ये शिकणारी विद्यार्थिनी आपल्या घरी न सांगताच काही मैत्रिणींना भेटण्यासाठी गेली होती. तेथेच तिची एका मुलाशी ओळख झाली. ती त्या मुलासोबत गेली असता, त्या मुलाने तिच्यावर बलात्कार केला. तसेच त्या मुलाने तिला त्याच्या काही मित्रांकडे सोपवलं. त्या 8 जणांनी विद्यार्थिनीवर बलात्कार केला.
विद्यार्थिनी 20 नोव्हेंबर रोजी घरी न सांगताच मैत्रिणींना भेटण्यासाठी गेली होती. त्यावेळी भेटलेल्या एका मुलासोबत ती गेली. 8 जणांनी तब्बल 13 दिवस मुलीवर बलात्कार केला. सतत झालेल्या या प्रकारानंतर मुलीची तब्येत बिघडली असल्याची माहिती आहे. मुलगी बेपत्ता झाल्याने, तिचे कुटुंबीय अतिशय चिंतेत होते. नातेवाईकांकडे मुलीचा शोध घेण्यात आला. मात्र ती कुठेही सापडली नाही.
भयंकर! पोलिसांनी कसून चौकशी केली असता समोर आलं धक्कादायक सत्यhttps://t.co/MjjZ9eCSeY#crime#crimesnews#Police
— Lokmat (@MiLOKMAT) December 7, 2020
मुलीच्या कुटुंबियांनी पोलिसांत मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार केली. तक्रारीनंतर तपास सुरू झाला आणि 5 डिसेंबर रोजी पोलिसांना मुलीचा शोध लागला. आरोपींना अटक करण्यात आली आहे. विद्यार्थिनीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, 13 दिवसांत 8 मुलांनी वेगवेगळ्या ठिकाणी बलात्कार केला आहे. 8 जणांपैकी 6 आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
रात्री कर्तव्यावर असणाऱ्या पोलिसांच्या टीमसोबत वाद घातला अन् प्राणघातक हल्ला केलाhttps://t.co/2eKz1uFW1R#crimesnews#crime#Police#Congress
— Lokmat (@MiLOKMAT) December 7, 2020