खळबळजनक! ८ वर्षाच्या मुलावर २५ वर्षाच्या नराधमाने केले लैंगिक अत्याचार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2020 09:49 PM2020-07-24T21:49:18+5:302020-07-24T22:03:29+5:30
पोलिसांनी आरोपी विरोधात पॉक्सोचा गुन्हा नोंद केला असून काल रात्री आरोपीला सायन येथून अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पालकांची झोप उडाली आहे.
मुंबई - धारावीत २५ वर्षाच्या नराधमाने ८ वर्षाच्या अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केला आहे. खेळण्याचे आणि पैशांचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलावर अत्याचार करण्यात आला आहे. ही खळबळजनक घटना धारावीतील मरिअम्मा मंदिरानजीक घडली. पोलिसांनी आरोपी विरोधात पॉक्सोचा गुन्हा नोंद केला असून काल रात्री आरोपीला सायन येथून अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पालकांची झोप उडाली आहे.
२२ जुलैला दुपारच्या सुमारास आरोपीने अल्पवयीन मुलाला खेळण्याचे आणि पैशांचे आमिष दाखवून मरिअम्मा मंदिराजवळ घेऊन गेला. तिथे वर्दळ नसल्याचं पाहून मुलावर लैंगिक अत्याचार केला. यावेळी त्याच परिसरात राहणारा मुलगा तेथे आल्याने आरोपी पीडित मुलाला तेथेच सोडून पळून गेला. लैंगिक अत्याचारानंतर मुलाला त्रास होऊ लागला. मात्र, भीतीपोटी मुलाने घरात सांगितले नाही. मुलाला त्रास होत असल्याचे पाहून मुलाच्या आईने मुलाला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता घडलेली घटना उघड झाली. नंतर मुलाच्या कुटुंबियांनी तातडीने पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. या घटनेमुळे धारावीतील पालक चिंतातुर झाले असून त्यांच्यात या घटनेमुळे तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
मुंबई - खळबळजनक! ८ वर्षाच्या मुलावर २५ वर्षाच्या नराधमाने केले लैंगिक अत्याचार pic.twitter.com/itIUJAWtzc
— Lokmat (@MiLOKMAT) July 24, 2020
अन्य महत्वाच्या बातम्या...
वकिलांना लोकलने प्रवास करण्याची परवानगी देऊ शकत नाही, राज्य सरकारची उच्च न्यायालयाला माहिती
...अन् फेसबुक फ्रेंडनं महिलेला घातला थोडा थोडका नव्हे, तर ११ लाखांचा गंडा
मनोरुग्ण तरुणीवर कारमध्ये अत्याचार; विवस्त्रवस्थेत आढळून आली पीडित तरुणी
कुलभूषण जाधव प्रकरणात पाकिस्तानची नवीच शक्कल; हायकोर्टाकडून वकील देण्याची मागणी
विकास दुबेला जामीन कसा मिळाला हा मुख्य मुद्दा; सुप्रीम कोर्टानं योगी सरकारला फटकारलं
कोर्टाचा दणका! राजा मान सिंग फेक चकमकप्रकरणी ११ पोलिसांनी जन्मठेपेची शिक्षा
सेक्स रॅकेट चालवणाऱ्या सोनू पंजाबनला कोर्टाने सुनावली २४ वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा