फूड अ‍ॅपच्या माध्यमातून ड्रग्जची तस्करी; कॉलेजेसमध्ये होत होता पुरवठा, 8 जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2022 08:42 AM2022-09-08T08:42:48+5:302022-09-08T08:44:33+5:30

Drugs : जप्त करण्यात आलेल्या सर्व मालाची किंमत कोट्यवधींच्या घरात आहे.

8 youths supplying drugs in schools and colleges arrested in delhi  | फूड अ‍ॅपच्या माध्यमातून ड्रग्जची तस्करी; कॉलेजेसमध्ये होत होता पुरवठा, 8 जणांना अटक

फूड अ‍ॅपच्या माध्यमातून ड्रग्जची तस्करी; कॉलेजेसमध्ये होत होता पुरवठा, 8 जणांना अटक

Next

दिल्ली : तरुणांमध्ये ड्रग्जची वाढती क्रेझ पाहता देशाची राजधानी दिल्लीत पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने छापा टाकून ड्रग्जची खेप पकडली आहे. पोलिसांनी वेगवेगळ्या कारवायांमध्ये 8 तरुणांना अटक केली आहे, ज्यामध्ये बीबीए, एमबीए, आयआयएम, बीटेक आणि फॅशन डिझायनर ड्रॉप आउट विद्यार्थी आहेत. हे विद्यार्थी अ‍ॅपच्या माध्यमातून ड्रग्ज सप्लाय करत होते.

आरोपी विद्यार्थी विशिष्ट गँग्ज, शाळा, महाविद्यालये, संस्था, व्यवस्थापन महाविद्यालये यांना टागरगेट करून याठिकाणी शिकणाऱ्या मुलांना ड्रग्जची सवय लावत होते. त्यासाठी वेगवेगळ्या कुरिअरद्वारे पुरवठा केला जात होता. दिल्लीत पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने ड्रग्ज संबंधित खुलासा करून एका मोठ्या मॉड्यूलचा पर्दाफाश केला आहे. त्याअंतर्गत एलएसडीचे 28 ब्लॉट पेपर, 12.6 ग्रॅम एमडीएमए, 84 ग्रॅम क्युरेटेड गांजा आणि 220 चरस जप्त करण्यात आले आहे. एलएसडीसाठी याची दिल्लीतील स्ट्रीट किंमत 5000 प्रति स्टॅम्प आहे. एमडीएमए ड्रग्जसाठी 4000 प्रति ग्रॅम आहे आणि क्युरेटेड गांजासाठी 3000 प्रति ग्रॅम आकारले जात होते.

या प्रकरणात पकडलेल्या तरुणांमध्ये बीबीए, बीटेक ड्रॉप आऊट आणि फॅशन इंजिनीअरचा समावेश आहे. आयआयटी ड्रॉप आउट हे देखील एलएसडीच्या पुरवठ्याचे स्त्रोत आहे. कुरिअर नेटवर्क सेवा ड्रग्जच्या तस्करीसाठी वापरली जात होती. ज्यामध्ये वी फास्ट, उबर डिलिव्हरी, स्विगी, जीनी आणि इतर माध्यमातून डिलिव्हरी केली जात होती. जप्त करण्यात आलेल्या सर्व मालाची किंमत कोट्यवधींच्या घरात आहे. पकडण्यात आलेले तीन कॅटगरीतील ड्रग्ज अत्यंत धोकादायक आहेत.

Web Title: 8 youths supplying drugs in schools and colleges arrested in delhi 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.