शेजारीच राहणाऱ्या नराधामाने दोन बहिणींवर केले लैंगिक अत्याचार; मुंबईतील धक्कादायक घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2020 12:27 PM2020-06-13T12:27:42+5:302020-06-13T12:46:14+5:30
एकीकडे कोरोनासारख्या महामारीचा एकजूटीने सामना करत असताना मुंबईतील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
मुंबई: संपूर्ण जगाला कोरोना व्हायरसने विळखा घातला आहे. भारतासह राज्यातही कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. राज्यात शुक्रवारी ३,४९३ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या १ लाख १ हजार १४१ वर पोहचली आहे. कोरोनाचा धोका कमी करण्यासाठी राज्य सरकारकडून आणि महापालिकेकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहे. मात्र एकीकडे कोरोनासारख्या महामारीचा एकजूटीने सामना करत असताना मुंबईतील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
मुंबईत मुंबईतील कुर्ला पश्चिम भागातील व्हीबी नगरमध्ये एक संतापजनक घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. शेजारी राहणाऱ्या ८० वर्षाच्या व्यक्तीने दोन अल्पवयीन बहिणींवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. यासंबंधित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला तात्काळ अटक केली आहे.
द इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, संबंधित आरोपीचे कुटुंब उत्तर प्रदेशमधील आहे. आरोपीने लॉकडाऊनच्या पूर्वीच आपल्या कुटुंबाला उत्तर प्रदेशात पाठवले होते. त्यानंतर त्याला देखील गावी जायचे होते. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन लागू करण्यात आल्यामुळे त्याला गावी जाता आले नाही. घरी एकटाच राहत असल्यामुळे पीडित कुटुंबाने माणुसकीच्या नात्याने आरोपीला जेवणाची व्यवस्था केली होती. त्यामुळे जेवण देण्यासाठी १२ वर्षाची आणि ७ वर्षाची मुलगी आरोपीच्या घरी जात होत्या. मात्र आरोपीने याचाच फायदा घेत दोन्ही मुलींवर लैगिक अत्याचार करत होता.
आरोपीला जेवण देण्यासाठी गेल्यानंतर एकदा खूप उशीर झाल्यानंतरही त्या घराबाहेर आल्या नव्हत्या. त्यामुळे शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीने आरोपीच्या घरात डोकावून पाहिले तर संतापजनक प्रकार समोर आला आहे. त्यानंतर शेजाऱ्याने आरडाओरडा करून पीडितेच्या कुटुंबीयांना माहिती दिली. हा सर्व प्रकार समोर आल्यानंतर पीडित कुटुंबाला मोठा धक्काच बसला. त्यानंतर त्यांनी स्थानिक पोलिस स्थानकात धाव घेत आरोपीवर गुन्हा दाखल केला.
महत्त्वाच्या बातम्या
"तुम्हाला रस्त्यावर फोडून काढल्याशिवाय गप्प बसणार नाही"; मनसेने दिला इशारा
CoronaVirus News : कोरोनाचा उद्रेक! देशातील रुग्णसंख्येने गाठला नवा उच्चांक; धडकी भरवणारी आकडेवारी