Digital Rape : अल्पवयीन मुलीवर ७ वर्ष 'डिजिटल रेप' केल्याप्रकरणी ८१ वर्षीय स्केच आर्टिस्टला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2022 03:36 PM2022-05-16T15:36:34+5:302022-05-16T16:12:05+5:30

Digital Rape Case : 'डिजिटल रेप' या शब्दाचा अर्थ हातची बोटे किंवा पायाची बोटे वापरून स्त्री किंवा मुलीसोबत जबरदस्तीने लैंगिक संबंध ठेवणे. डिसेंबर २०१२ पर्यंत डिजिटल रेप हा बलात्काराच्या कक्षेत आला नव्हता

81-year-old sketch artist arrested for 'raping' a minor girl for 7 years | Digital Rape : अल्पवयीन मुलीवर ७ वर्ष 'डिजिटल रेप' केल्याप्रकरणी ८१ वर्षीय स्केच आर्टिस्टला अटक

Digital Rape : अल्पवयीन मुलीवर ७ वर्ष 'डिजिटल रेप' केल्याप्रकरणी ८१ वर्षीय स्केच आर्टिस्टला अटक

googlenewsNext

उत्तर प्रदेशातील नोएडा येथे एका ८१ वर्षीय स्केच आर्टिस्टला १७ वर्षांच्या मुलीवर सात वर्षांहून अधिक काळ कथित 'डिजिटल' बलात्कार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली. पीटीआय या वृत्तसंस्थेने एका पोलीस प्रवक्त्याचा हवाला देऊन सांगितले की, या व्यक्तीवर गेल्या सात वर्षांत १७ वर्षांच्या मुलीवर डिजिटल बलात्कार केल्याचा आरोप आहे.

'डिजिटल रेप' या शब्दाचा अर्थ हातची बोटे किंवा पायाची बोटे वापरून स्त्री किंवा मुलीसोबत जबरदस्तीने लैंगिक संबंध ठेवणे. डिसेंबर २०१२ पर्यंत डिजिटल रेप हा बलात्काराच्या कक्षेत आला नव्हता. तथापि, निर्भया सामूहिक बलात्कारानंतर, लैंगिक गुन्ह्याचे वर्गीकरण 'डिजिटल रेप' म्हणून भारतात झाले, ज्यामुळे देशातील गुन्हेगारी कायद्यांमध्ये सुधारणा करण्यात आल्या. 



व्यक्तीवर डिजिटल बलात्काराचा आरोप
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडिता तिच्या पालकासोबत राहते, तिची जवळपास २० वर्षांपासून आरोपीसोबत मैत्री आहे. मुलगी सुरुवातीला तक्रार नोंदवायला घाबरली होती. पण नंतर तिने संशयिताच्या लैंगिक छळाची नोंद करण्यास सुरुवात केली आणि मोठे पुरावे गोळा केले. तिने पालकांना तिला होणारा त्रास सांगितला. नंतर तक्रार नोंदवण्यासाठी पालकांनी पोलिसांकडे संपर्क साधला.

स्केच आर्टिस्टसह शिक्षक असलेल्या संशयिताला रविवारी स्थानिक सेक्टर 39 पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६ (बलात्कार), ३२३ (स्वेच्छेने दुखापत करणे), ५०६ (धमकावणे) अंतर्गत त्याच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला.

सेक्टर 39 चे एसएचओ राजीव कुमार यांनी पीटीआयला सांगितले की, "मुलगी येथे तिच्या पालकासोबत राहते, ती जवळपास 20 वर्षांपासून आरोपीला मित्र म्हणून ओळखत आहे. पालकाने या प्रकरणी तक्रार दाखल केली होती."

न्यायालयीन कोठडीत आरोपी
त्याच्या अटकेनंतर, आरोपीला स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले आणि त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.

भारतात डिजिटल बलात्काराचा आरोप कुणावर असल्यास, गुन्हेगारांवर आता आयपीसी कलम ३७६ (बलात्कार) अंतर्गत गुन्हा दाखल केला जातो. परंतु डिजिटल बलात्काराच्या प्रकरणांमध्ये शिक्षा होण्याचे प्रमाण अजूनही देशात तुलनेने कमी आहे.

Read in English

Web Title: 81-year-old sketch artist arrested for 'raping' a minor girl for 7 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.