11 महिन्यांत 86 बलात्कार, 185 अत्याचार; उन्नाव बनली उत्तर प्रदेशची 'राजधानी'

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2019 06:44 PM2019-12-07T18:44:30+5:302019-12-07T18:46:13+5:30

हे आकडे पाहता उत्तर प्रदेशाची उन्नावला बलात्काराची राजधानी म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

86 rapes, 185 abuse in 11 months; Unnao becomes 'capital' of Uttar Pradesh | 11 महिन्यांत 86 बलात्कार, 185 अत्याचार; उन्नाव बनली उत्तर प्रदेशची 'राजधानी'

11 महिन्यांत 86 बलात्कार, 185 अत्याचार; उन्नाव बनली उत्तर प्रदेशची 'राजधानी'

googlenewsNext
ठळक मुद्दे२०१९ म्हणजे ह्यावर्षी जानेवारी ते नोव्हेंबर या ११ महिन्यांदरम्यान बलात्काराच्या तब्बल ८६ घटनांची नोंद झाली आहे. राजकारणातील मात्तबरांच्या इच्छेशिवाय तो पोलीस एक इंचही पुढे सरकत नाही. ही गोष्ट गुन्हेगारांचे मनोबल वाढवते.

उन्नाव - उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊपासून अवघ्या ६३ किलोमीटर अंतरावर असलेला उन्नाव हा जिल्हा आहे. या जिल्ह्यात कायद्याचा वचक राहिला आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे. उन्नाव पहिल्यांदा चर्चेत आले ते भाजप आमदार कुलदीप सेंगर यांच्यावर एका १७ वर्षीय तरुणीनं केलेल्या लैंगिक छळाच्या आरोपामुळे. ४ जून २०१७ रोजी सेंगर यांच्या बंगल्यावर सामूहिक बलात्कार झाल्याचा तिचा आरोप आहे. त्यानंतर अपघात घडवून पीडित तरुणीला आणि वकिलाला मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. २०१९ म्हणजे ह्यावर्षी जानेवारी ते नोव्हेंबर या ११ महिन्यांदरम्यान बलात्काराच्या तब्बल ८६ घटनांची नोंद झाली आहे. तसेच लैंगिक अत्याचाराची १८५ प्रकरणे घडली आहेत. हे आकडे पाहता उत्तर प्रदेशाची उन्नावला बलात्काराची राजधानी म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

उन्नाव जिल्ह्यात भाजप निलंबित आमदार कुलदीप सिंह सेंगरविरोधात बलात्काराचा आरोप केल्यानंतर पीडितेचा अपघात घडल्यानंतर हे प्रकरण देश - विदेशात गाजले. आता उन्नावमध्ये सामूहिक बलात्कारानंतर पीडित तरुणीला जाळल्याने तिचा मृत्यू झाला. या घटनेने देशभरात खळबळ माजली आहे. उन्नाव येथे बलात्कार आणि विनयभंगाच्या आरोपाखाली अनोहा, अजगैन, माखी आणि बांगरमऊ येथे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बहुतांश घटनांमध्ये आरोपींना अटक करून जामिनावर सोडण्यात आले होते किंवा ते अद्याप अटकेपासून दूर आहेत. अजगैन येथील रहिवासी राघव राम शुक्ला सांगतात, 'उन्नावमधील पोलीस राजकीय दबावाखाली आहेत. राजकारणातील मात्तबरांच्या इच्छेशिवाय तो पोलीस एक इंचही पुढे सरकत नाही. ही गोष्ट गुन्हेगारांचे मनोबल वाढवते.

Web Title: 86 rapes, 185 abuse in 11 months; Unnao becomes 'capital' of Uttar Pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.