चटईक्षेत्र खरेदीत ८८ लाखांना फसवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2021 02:56 PM2021-11-13T14:56:38+5:302021-11-13T14:56:46+5:30

विकासकाने एफएसआय घेण्याच्या मोबदल्यात ठरलेल्या ८८ लाख रुपयांची फसवणूक करत गुंडांच्या सहाय्याने बळजबरी जागेचा कब्जा घेण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी काशीमीरा पोलीस ठाण्यात ६ जणां विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे .

88 lakh was cheated in the purchase of carpet area land developement | चटईक्षेत्र खरेदीत ८८ लाखांना फसवले

चटईक्षेत्र खरेदीत ८८ लाखांना फसवले

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मीरारोड - एका विकासकाने एफएसआय घेण्याच्या मोबदल्यात ठरलेल्या ८८ लाख रुपयांची फसवणूक करत गुंडांच्या सहाय्याने बळजबरी जागेचा कब्जा घेण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी काशीमीरा पोलीस ठाण्यात ६ जणां विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे .

मीरारोडच्या सिल्वर पार्क येथे राहणारे बांधकाम व्यावसायिक सुरेंद्र देवीप्रसाद उपाध्याय (४५) यांनी बुधवारी १० नोव्हेम्बर रोजी दिलेल्या फिर्यादी नुसार काशीमीरा पोलीस ठाण्यात मे.आरडी डेव्लपर्स चे भागीदार कल्पेश राजपरा सह अन्य ५ अनोळखी इसमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे . मीरे गाव येथील उर्मिला म्हात्रे, ज्योती म्हात्रे, हर्षला म्हात्रे ह्या मूळ जमीन मालकांनी त्यांची ६ गुंठे जमिन विकली . २०१६ साली उपाध्याय यांनी ३५४. २२ चौमी चे चटईक्षेत्र कल्पेश यांना ८८ लाखांना विकण्याचा करार केला .

परंतु कल्पेश यांनी पैसे न दिल्याने त्याच वर्षी ठाणे न्यायालयात दावा दाखल केला . गुंडां मार्फत जागेचा बेकायदेशीर कब्जाचा प्रयत्न कल्पेश ने चालविल्याने त्यांनी २०१८ सलत काशीमीरा पोलीस ठाण्यात तक्रारी अर्ज केला . तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक देवीदास हंडोरे यांनी चौकशी केली होती. चौकशीदरम्यान कल्पेशने एफएसआयचा मोबदला म्हणून प्रत्येकी ४४ लाखांचे दोन धनादेश उपाध्याय यांना दिले पण ते दोन्ही वटले नाहीत .

गेल्या महिन्यात कल्पेश हा २० ते २५ लोकांना घेऊन जागेचा कब्जा साठी रखवालदारास मारहाण केली व जीवे मारायची धमकी देत हुसकावून लावले . या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे .

Web Title: 88 lakh was cheated in the purchase of carpet area land developement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.