८ वीची विद्यार्थिनी बनली आई, कुटुंबाला बसला धक्का; सतत शाल ओढून असायची, मग...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2023 08:35 PM2023-01-21T20:35:16+5:302023-01-21T20:35:41+5:30
या विद्यार्थिनीचे तिच्या विवाहित काकासोबत प्रेमसंबंध होते. याच प्रकरणी गावात १६ जुलै २०२२ रोजी एक बैठक झाली होती.
गुमला - झारखंडच्या गुमला जिल्ह्यात कस्तुरबा गांधी विद्यालयातील ८ वीच्या वर्गात शिकणाऱ्या १६ वर्षीय मुलीने रुग्णालयात एका मुलीला जन्म दिला. या धक्कादायक प्रकारानंतर कुटुंबाने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या मुलीच्या तिच्या काकासोबत प्रेम प्रकरण होते. त्याबाबत गावच्या पंचायतीत बैठकही झाली होती असा खुलासा आता समोर आला आहे.
विशेष म्हणजे मुलीच्या पोटात काल रात्रीपासून दुखायला सुरूवात झाली. त्यानंतर कुटुंबाने तिला रुग्णालयात नेले. त्याठिकाणी ती गर्भवती असल्याचं उघड झाले. डॉक्टरांनी या मुलीला प्रसुती वार्डात नेले त्याठिकाणी मुलीची नॉर्मल डिलीवरी झाली असून तिने एका मुलीला जन्म दिला. ऑगस्ट महिन्यात या मुलीचं एडमिशन झालं होते. त्यावेळी ती बरी होती. कुणालाही ती गर्भवती असल्याचं समजले नाही. ती नेहमी शाल ओढून असायची. त्यामुळे ती गर्भवती असल्याची शंका कुणाला आली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, या विद्यार्थिनीचे तिच्या विवाहित काकासोबत प्रेमसंबंध होते. याच प्रकरणी गावात १६ जुलै २०२२ रोजी एक बैठक झाली होती. यात दोघांनी एकमेकांपासून दूर राहायचं हे ठरलं. जर पुन्हा दोघांना एकत्र पकडले तर १ लाख रुपये दंड भरावा लागेल असं पंचायतीत निश्चित झाले. त्यानंतर ऑगस्टमध्ये या मुलीने कस्तुरबा विद्यालयात एडमिशन घेतले होते.
तपासासाठी ४ सदस्यीय टीम गठीत
आता या प्रकरणी तपासासाठी डिईओ सुनील शेखर, अतिरिक्त जिल्हाधिकारी पीयूष कुमार, सुमित्रा तिर्की आणि लेखा परिक्षण अधिकारी एसएस माधुरी मिंझ यांचे तपास पथक बनवण्यात आले आहे. तपासानंतर आरोपीविरोधात कारवाई केली जाणार आहे.