नाशिकमध्ये भरधाव बोलेरोने घेतला आठवीच्या विद्यार्थ्याचा बळी; एकुलत्या एका मुलाच्या मृत्यूने हळहळ

By अझहर शेख | Published: August 11, 2022 03:22 PM2022-08-11T15:22:20+5:302022-08-11T15:22:28+5:30

नागरिक व तेथील पोलिसांच्या मदतीने त्यांनी जीपचालक संशयित सम्राट यास पाठलाग करून सरकारवाडा पोलिसांच्या हवाली केले.

8th student killed by speeding bolero in Nashik; Saddened by the death of an only child | नाशिकमध्ये भरधाव बोलेरोने घेतला आठवीच्या विद्यार्थ्याचा बळी; एकुलत्या एका मुलाच्या मृत्यूने हळहळ

नाशिकमध्ये भरधाव बोलेरोने घेतला आठवीच्या विद्यार्थ्याचा बळी; एकुलत्या एका मुलाच्या मृत्यूने हळहळ

Next

नाशिक : गंगापुररोडवरून हनुमानवाडीमार्गे भरधाव मखमलाबादरोडने महामार्गाकडे जाणाऱ्या बोलेरो जीपच्या चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत एका सायकलस्वार शाळकरी मुलाला धडक दिली. या धडकेत साई मोहन देशमुख (१४.रा.साईराम कॉम्प्लेक्स, देवीमंदिरासमोर) याचा जागीच मृत्यु झाला. अपघातानंतर जीपचालक भरधाव वेगाने गंगापुररोडच्या दिशेने सुसाट निघाला. प्रत्यक्षदर्शी जागरूक दुचाकीस्वाराने त्याचा पाठलाग करत जुना गंगापुरनाका येथे त्यास रोखून पोलिसांच्या हवाली केले.

मखमलाबादरोडवरुन भरधाव वेगाने बोलेरो जीप (एम.एच३९ जे ३४१४) चालवून निष्काळजीपणे सायकलस्वार मुलाला बुधवारी (दि.१०) संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास धडक दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या धडकेत लहानग्या साईचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्याच्या डोक्याला जबर मार लागल्याने तो गंभीरपणे जखमी झाला होता. रुग्णालयात नेले असता त्यास डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. 
अपघातग्रस्त जीपचालक संशयित सम्राट चंद्रकांत पगारे (२७,रा.कळमधरी ता.नांदगाव) याने घटनास्थळी थांबून जखमीची मदत न करता तेथून वाहनासह पसार होणे पसंत केले.

नागरिक व तेथील पोलिसांच्या मदतीने त्यांनी जीपचालक संशयित सम्राट यास पाठलाग करून सरकारवाडा पोलिसांच्या हवाली केले. पोलिसांना अपघातबद्दल माहिती दिली. काही वेळेतच पंचवटी पोलीसदेखील या ठिकाणी दाखल झाले. त्यांनी जीपचालक सम्राट पगारे यास ताब्यात घेतले. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध कमलेश प्रकाश देशमुख (३०) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन मृत्युस कारणीभूत ठरल्याप्रकरणी तसेच मोटार वाहन कायद्यांतर्गत पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: 8th student killed by speeding bolero in Nashik; Saddened by the death of an only child

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात