पोलीस कोठडीतील ९ आरोपींना विषबाधा, नालासोपाऱ्यातील धक्कादायक प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2023 05:33 PM2023-02-08T17:33:23+5:302023-02-08T17:35:21+5:30

नालासोपारा पोलीस कोठडीतील प्रकार

9 accused in police custody were poisoned, a shocking incident in Nalasopara | पोलीस कोठडीतील ९ आरोपींना विषबाधा, नालासोपाऱ्यातील धक्कादायक प्रकार

पोलीस कोठडीतील ९ आरोपींना विषबाधा, नालासोपाऱ्यातील धक्कादायक प्रकार

googlenewsNext

नालासोपारा (मंगेश कराळे) :- शहरातील पोलीस ठाण्याच्या पोलीस कोठडीत असेलल्या ९ आरोपींना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या सर्व आरोपींना पालिकेच्या रुग्णालात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

नालासोपारा पोलीस ठाण्याच्या पोलीस कोठडीत ९ आरोपी होते. त्यापैकी ५ आरोपी नालासोपारा पोलीस ठाण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिकांच्या हत्येतील तर ४ आरोपी पेल्हार पोलीस ठाण्यातील एटीएम फसवणूक गुन्ह्यातील आहेत. मंगळवारी दुपारी या आरोपींना नेहमीप्रमाणे जेवण देण्यात आले होते. त्यांनतर काही वेळात दोन आरोपींना उल्ट्या सुरू झाल्या. पाठोपाठ इतर आरोपींनाही तोच त्रास सुरू झाला. त्यामुळे या सर्व आरोपींना नालासोपारा येथील पालिकेच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या सर्व आरोपींची प्रकृती स्थिर असून अन्नाचे नमुने तपासणीसाठी पाठवले. तसेच याबाबत चौकशी सुरू असल्याची माहिती नालासोपारा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सुपे यांनी लोकमतला दिली आहे.

Web Title: 9 accused in police custody were poisoned, a shocking incident in Nalasopara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.