धक्कादायक... गुजरातमध्ये वर्षभरात 9 कोटींच्या बनावट नोटा जप्त; देशाच्या 32 टक्के

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2019 08:39 AM2019-11-26T08:39:40+5:302019-11-26T08:40:47+5:30

गुजरात पोलिसांनी रविवारी खेडी जिल्ह्यातील एका बांधकाम सुरू असलेल्या मंदिरावर छापा मारला.

9 crore fake currency notes seized in Gujarat during the year 2017; 32 percent of the country | धक्कादायक... गुजरातमध्ये वर्षभरात 9 कोटींच्या बनावट नोटा जप्त; देशाच्या 32 टक्के

धक्कादायक... गुजरातमध्ये वर्षभरात 9 कोटींच्या बनावट नोटा जप्त; देशाच्या 32 टक्के

googlenewsNext

गांधी नगर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदी करून तीन वर्षे झाली. यावेळी बनावट नोटा, दहशतवाद, काळा पैसा आदी कारणे यामागे देण्यात आली होती. मात्र, तीन वर्षांनंतरही देशभरात बनावट नोटांचा सुळसुळाट सुरूच असल्याचे गुजरातमध्ये वर्षभरात पकडल्या गेलेल्या बनावट नोटांच्या आकड्यावरून दिसून येत आहे. 


गुजरात पोलिसांनी रविवारी खेडी जिल्ह्यातील एका बांधकाम सुरू असलेल्या मंदिरावर छापा मारला. यावेळी बनावट नोटा छापणाऱ्या लोकांना पकडण्यात आले आहे. मंदिराच्या आश्रमामध्ये हा धक्कादायक प्रकार सुरू होता. येथून दोन हजाराच्या 70 लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. पोलिसांनी एका साधूसह दोघांना ताब्यात घेतले आहे. 


गेल्या महिन्यात पोलिसांनी बडोद्यातून दोन आरोपींकडून 500 रुपयांच्या 175 बनावट नोटा जप्त केल्या होत्या. या आरोपींना चार महिन्यात चार लाख बनावट रुपये बाजारात चलनात आणले होते. अशीच एक टोळी भावनगरमध्ये पकडण्यात आली होती. 


सरकारी आकडेवारीनुसार गुजरात बनावट नोटांचा गडच बनल्याचे चित्र आहे. 2017 मध्ये देशभरात जप्त केलेल्या बनावट नोटांपैकी 32 टक्के नोटा एकट्या गुजरातमधून होत्या. ही किंमत 9 कोटींहून अधिक आहे. दिल्ली यामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. देशातील 50 टक्क्यांपेक्षा जास्त बनावट नोटा याच दोन राज्यांमधून जप्त करण्यात आल्या आहेत. 


एनसीआरबीने नोटाबंदीनंतर बनावट नोटांची दखल त्यांच्या अहवालामध्ये घेण्यास सुरूवात केली होती. यानुसार 2017 मध्ये 28.1 कोटी रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. 2016 मध्ये जप्त केलेल्या नोटांच्या तुलनेत हा आकडा 76 टक्क्यांनी जास्त आहे. तेव्हा 15.9 कोटी रुपये जप्त करण्यात आले होते.

Web Title: 9 crore fake currency notes seized in Gujarat during the year 2017; 32 percent of the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.