बापरे! सिम अपडेटसाठी 11 रुपये मागितले अन् खात्यातून 9 लाख गायब केले; असा घातला जातोय गंडा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2021 08:22 AM2021-12-10T08:22:08+5:302021-12-10T08:27:30+5:30

Crime News : 11 रुपयांच्या नावाने एका खात्यातून फ्रॉड करणाऱ्यांनी तब्बल 9 लाखांच्या रक्कमेवर डल्ला मारला आहे.

9 lakh 39 thousand blown from retired employees account name of sim update cheated by-downloading anydesk app | बापरे! सिम अपडेटसाठी 11 रुपये मागितले अन् खात्यातून 9 लाख गायब केले; असा घातला जातोय गंडा

बापरे! सिम अपडेटसाठी 11 रुपये मागितले अन् खात्यातून 9 लाख गायब केले; असा घातला जातोय गंडा

googlenewsNext

नवी दिल्ली - सोशल मीडियाचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो. मात्र हल्ली यामुळे होणाऱ्या फ्रॉडची संख्या देखील वाढली आहे. विविध मार्गांचा वापर करून हॅकर्स युजर्सना आपल्या जाळ्यात ओढत आहेत. अनेक जण ऑनलाईन फ्रॉडचे शिकार होत आहेत. अशीच एक धक्कादायक घटना आता समोर आली आहे. सिम अपडेट करण्याच्या नावाने एका सेवानिवृत्त अधिकाऱ्याची मोठी फसवणूक करण्यात आली आहे. 11 रुपयांच्या नावाने एका खात्यातून फ्रॉड करणाऱ्यांनी तब्बल 9 लाखांच्या रक्कमेवर डल्ला मारला आहे. जोधपूरमध्ये ही घटना घडली असून वृद्ध व्यक्तीला सिम अपडेट करायचं कारण सांगून त्याची फसवणूक करण्यात आली आहे. 

सेवानिवृत्त अधिकाऱ्याच्या खात्यातून तब्बल 9.39 लाख रुपये काढण्यात आले आहेत. गुगलवर एनीडेस्क एप डाउनलोड करवून हा गुन्हा करण्यात आला. ही घटना 4 डिसेंबर रोजी घडली होती. बँकेचं स्टेटमेंट काढल्यानंतर याबद्दल माहिती मिळाली. यानंतर पीडित व्यक्तीने प्रतापनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन याबाबत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या प्रकरणात तपास सुरू केला आहे. जोधपूरमध्ये प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या प्रमुखांनी याबाबत माहिती दिली आहे. कमला नेहरू नगर द्वितीय विस्तार योजना सी-103 मध्ये राहणारे राजकुमार जोशी पुत्र रामेश्वरदत्त जोशी सरकारी सेवेतून निवृत्त झाले आहेत.

सिम अपडेट करायचं सांगून 9.39 लाखांवर मारला डल्ला

जोशी यांचं एसबीआयमध्ये बँक अकाऊंट आहे. ते बीएसएलएनच्या सिमचा वापर करत होते. मात्र बऱ्याच दिवसांपासून सिम वापरत नसल्यामुळे ते बंद झालं होतं. आता 3 डिसेंबर रोजी त्यांना एका नंबरवरुन मेसेज आला की, सिम बंद झालं आहे. तुम्ही 24 तासात तो रिचार्ज करा, अन्यथा ब्लॉक करण्यात येईल. यावेळी त्यांनी हा मेसेज आलेल्या नंबरवर कॉल केला तर तो बंद होता. या प्रकरणात त्यांनी तीन ते चार वेळा फोन करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र फोन बंद येत होता. यांतर राजकुमार जोशी यांना एक फोन आला व त्यांनी सिम बंद असल्याची माहिती दिली.

निवृत्त अधिकारी सायबर क्राईमला पडले बळी

समोरील व्यक्तीने बीएसएनएलच्या कार्यालयातून बोलत असल्याचं सांगितलं आणि ऑनलाईन सिम सुरू करून देऊ असंही सांगितलं. सुरुवातीला त्यांनी सिम रिचार्ज करण्यासाठी 11 रुपये टाकण्यास सांगितलं. 11 रुपयांचं रिचार्ज न झाल्याने त्याने सांगितलं की, ते गुगलवर एनिडेस्क एप डाऊनलोड करा. यानंतर त्यांना आपल्या बोलण्यात अडकवून बँक अकाऊंटमधून 9 लाख 39 हजार रुपये काढून घेतले. पैसे गेल्याचा मेसेज आल्यानंतर ते तातड़ीने बँकेच्या कार्यालयात मिनी स्टेटमेंट काढण्यासाठी गेले. येथे आल्यावर त्यांच्या लक्षात आलं की, चोरांनी पैशावर डल्ला मारला. जोशी यांनी पोलीस ठाण्यात जाऊन फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: 9 lakh 39 thousand blown from retired employees account name of sim update cheated by-downloading anydesk app

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.