सोशल मीडियावर ९ वर्षाचा मुलगा करत होता अश्लील व्हिडीओ व्हायरल; चक्रावून टाकणारे खुलासे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2021 07:47 PM2021-12-04T19:47:53+5:302021-12-04T19:50:25+5:30
Child Pornography Case : पॅन दिल्लीच्या आधारे विविध पोलीस ठाण्यांमध्ये १०० हून अधिक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच दोषींवर आवश्यक कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत आतापर्यंत ९७ जणांना अटक करण्यात आली आहे.
दिल्लीपोलिसांनी चाईल्ड पोर्नोग्राफीविरोधात पॅन दिल्ली ऑपरेशन सुरू केले आहे. त्याला 'ऑपरेशन मासूम' असं नाव देण्यात आलं आहे. तसेच या कारवाईदरम्यान अनेक चक्रावून टाकणारे खुलासे झाले आहेत. सोशल मीडियावर अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी निजामुद्दीन पोलीस ठाण्यात ९ वर्षांच्या मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांनी मुलाची त्याच्या घरी जाऊन सखोल चौकशी केली आहे.
या प्रकरणाबाबत दिल्ली पोलिसांकडून अधिकृतपणे माहिती देण्यात आलेली नाही. दक्षिण-पूर्व जिल्ह्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, आरोपी मुलगा दक्षिण दिल्लीतील एका नामांकित शाळेत शिकतो आणि तो ९ वर्षांचा आहे. मुलाने अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यासाठी वडिलांच्या मोबाईलचा वापर केला. तसेच त्यासाठी त्याने ई-मेल आयडीही तयार केला होता. मात्र, मुलाचे वडील कमी शिकलेले असल्याने या मुलाकडे अश्लील व्हिडिओ कोठून आले, याची अद्याप उकल होऊ शकलेली नाही.
"मॅडमची तब्येत बिघडली आहे, माझ्या घरी जेवण पाठव!"; ऑडिओ व्हायरल होताच पोलीस निलंबित
एनसीएमईसी (NCMEC) या अमेरिकन सामाजिक संस्थेच्या तक्रारीवरून निजामुद्दीन पोलीस ठाण्यात मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी मुलाची चौकशी करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. काही कालावधीआधी मुलाने हा व्हिडिओ पाठवला होता. एनसीएमईसी ही सामाजिक संस्था सोशल मीडियावरील चाइल्ड पोर्नोग्राफीवर नजर ठेवते आणि अशी प्रकरणं समोर आल्यावर संबंधित देशाला माहिती दिली जाते. एनसीएमईसीने या मुलाच्या प्रकरणाची माहिती एनसीआरबीला दिली आणि एनसीआरबीने ही माहिती दिल्ली पोलिसांपर्यंत पोहोचवली. याप्रकरणी दिल्ली पोलीस तपास करत आहेत.
विवाहबाह्य संबंधातून भाच्याच्या मदतीने पत्नीने केली पतीची हत्या
आतापर्यंत 97 जणांना अटक
स्पेशल सेलचे सायबर क्राईम युनिट आणि सर्व जिल्हा पोलिसांच्या सहकार्याने 'ऑपरेशन मासूम' राबविण्यात येत आहे. बाल पोर्नोग्राफीशी संबंधित माहिती सायबर क्राईम युनिटला नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो (NCRB) मार्फत दिली जाते. पॅन दिल्लीच्या आधारे विविध पोलीस ठाण्यांमध्ये १०० हून अधिक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच दोषींवर आवश्यक कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत आतापर्यंत ९७ जणांना अटक करण्यात आली आहे.