9 वर्षीय मुलीवर बलात्कार अन् तिच्या शरीराचे केले 10 तुकडे; कोर्टाने सुनावली फाशीची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2024 08:46 PM2024-11-04T20:46:06+5:302024-11-04T20:47:38+5:30

पुरावे नष्ट केल्याप्रकरणी आरोपीच्या आई-वडिलांना 4 वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

9-year-old girl raped, body hacked into 10 pieces; court ordered death sentence | 9 वर्षीय मुलीवर बलात्कार अन् तिच्या शरीराचे केले 10 तुकडे; कोर्टाने सुनावली फाशीची शिक्षा

9 वर्षीय मुलीवर बलात्कार अन् तिच्या शरीराचे केले 10 तुकडे; कोर्टाने सुनावली फाशीची शिक्षा

Udiapur Crime News : उदयपूरच्या POCSO न्यायालयाने आज एक मोठा निर्णय दिला. एका 9 वर्षीय मुलीवर बलात्कार करुन नंतर तिच्या शरीराचे 10 तुकडे करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. याशिवाय आरोपीच्या पालकांनाही न्यायालयाने 4 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. त्यांच्यावर पुरावे नष्ट केल्याचा आरोप आहे. ही धक्कादायक घटना गेल्यावर्षी मार्च महिन्यात घडली होती. 

चॉकलेट देण्याच्या बहाण्याने घरात बोलावले
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी कमलेश घरात एकटा होता आणि मोबाईलवर पॉर्न फिल्म पाहत होता, यावेळी त्याला ही मुलगी दिसली. त्याने मुलीला चॉकलेट देण्याच्या बहाण्याने घरात बोलावून तिच्यावर बलात्कार केला. मुलीने आरडाओरडा केल्यानंतर त्याने तिच्या तोंडात कपडा भरला आणि तिची हत्या केली. त्यानंतर चाकूने मुलीच्या शरीराचे 10 तुकडे केले गोणीत भरले. ही बाब आरोपीच्या पालकांना समजताच तिघांनी मिळून मुलीचे तुकडे घरापासून दूर फेकून दिले. ज्या मुलीवर आरोपीने अत्याचार केले, ती त्याला दादा म्हणायची आणि रक्षाबंधनाला राखीही बांधायची.

मुलीचा शोध घेत असलेल्या कुटुंबीयांनी याप्रकरणी 29 मार्च रोजी तक्रार दाखल केली होती. फिर्यादीत त्यांनी लिहिले होते की, 4 वाजता शाळेतून आल्यानंतर मुलीने ड्रेस बदलून मामाच्या घरी जात असल्याचे सांगितले. मात्र, बराच वेळ होऊनही मुलगी परतली नाही. तक्रार आल्यानंतर पोलिसांनी श्वानपथकाच्या मदतीने शोधमोहीम सुरू केली आणि 1 एप्रिल रोजी मुलीचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत सापडला.

Web Title: 9-year-old girl raped, body hacked into 10 pieces; court ordered death sentence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.