मंदिरातील पुजाऱ्याच्या अंगावरुन चादर हटवली अन् सर्वांना धक्काच बसला; शीर धडापासून वेगळं!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2022 05:59 PM2022-03-30T17:59:47+5:302022-03-30T18:00:43+5:30

गुरुग्राममधील कादरपूर गावात एका ९० वर्षीय मंदिराच्या पुजाऱ्याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. मारेकऱ्यांनी पुजाऱ्याचं शीर धडापासून वेगळं केलं आणि नंतर पुजाऱ्याचा मृतदेह ब्लँकेटनं झाकून पळ काढला.

90 year old priest found dead inside temple in gurugram | मंदिरातील पुजाऱ्याच्या अंगावरुन चादर हटवली अन् सर्वांना धक्काच बसला; शीर धडापासून वेगळं!

मंदिरातील पुजाऱ्याच्या अंगावरुन चादर हटवली अन् सर्वांना धक्काच बसला; शीर धडापासून वेगळं!

googlenewsNext

गुरुग्राम-

गुरुग्राममधील कादरपूर गावात एका ९० वर्षीय मंदिराच्या पुजाऱ्याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. मारेकऱ्यांनी पुजाऱ्याचं शीर धडापासून वेगळं केलं आणि नंतर पुजाऱ्याचा मृतदेह ब्लँकेटनं झाकून पळ काढला. माहिती मिळताच गुरुग्राम पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला आहे. 

गावातील प्राचीन मोहन राम मंदिराच्या ९० वर्षीय पुजाऱ्याचा कोणीतरी शिरच्छेद करून हत्या केल्याची माहिती गावात पसरताच कादरपूर गावात खळबळ उडाली आहे. कादरपूरमध्ये सुमारे ४० वर्षे जुनं मोहन रामाचं मंदिर आहे, ज्याला तीजन वाला मंदिर नावानंही ओळखलं जातं. मंदिर बांधलं गेलं तेव्हापासून एक पुजारी मंदिरात पुजेचं काम पाहात होते, ज्याचं नाव गोविंद दास असं होतं. त्यांचं वय जवळपास ९० वर्षे इतकं होतं. मंदिराचे पुजारी गेल्या एक वर्षापासून अर्धांगवायूने ​​त्रस्त असून त्यांना चालता येत नव्हतं. त्यांच्यासाठी मंदिरात एक सेवक ठेवलेला होता, जो मंगळवारी सकाळी त्याच्या गावी गेला आणि त्याच रात्री उशिरा कोणीतरी ही घटना घडवून आणली आहे.

दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा एक ग्रामस्थ पुजाऱ्याला चहा देण्यासाठी मंदिरात आला तेव्हा अनेकदा आवाज देऊनही त्यांनी प्रतिसाद दिला नाही. यानंतर गावकऱ्यानं पुजाऱ्याच्या अंगावरुन ब्लँकेट काढून त्याला पाहिलं असता त्याचं डोकं शरीरापासून वेगळं करण्यात आलं होतं. मंदिराच्या पुजाऱ्याच्या हत्येची माहिती गावात वणव्यासारखी पसरली आणि संपूर्ण गाव मंदिरात जमा झालं. 

गुरुग्राम पोलिसांनाही याची माहिती देण्यात आली. त्यानंतर क्राइम डीसीपी, एसीपी, फॉरेन्सिक टीम आणि श्वान पथकालाही घटनास्थळी पाचारण करण्यात आलं. पुजाऱ्याच्या खिशात असलेले पैसे तसेच होते त्यामुळे प्राथमिक तपासात ही चोरीची घटना असल्याचं दिसत नाही. पण नीट चालता न येणार्‍या ९० वर्षांच्या पुजार्‍यासोबत वैर काय असू शकते, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. आता गुरुग्राम पोलीस या सर्व बाबींचा तपास करत आहेत.

Web Title: 90 year old priest found dead inside temple in gurugram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.