शिक्षकाच्या अकाऊंटमधून ९२ हजार उडविले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 12:09 PM2021-04-18T12:09:31+5:302021-04-18T12:09:40+5:30
92,000 stolen from teacher's account : एका शिक्षकाच्या फोन पे अकाऊंटमधून ९२ हजार रूपये उडविल्याची घटना उघडकीस आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव :ऑनलाईन फसवणुकीच्या घटना वाढत चालल्या असून, एका शिक्षकाच्या फोन पे अकाऊंटमधून ९२ हजार रूपये उडविल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी फोन पे कस्टमर केअरधारकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शामल नगर भागातील रहिवाशी तसेच टेंभुर्णा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेवर शिक्षक म्हणून कार्यरत असलेले प्रकाश राधाकृष्ण ढवळे (४९) हे फोन पे चा वापर करतात. दरम्यान अचानक त्यांच्या फोन पे अकाऊंटमधून पैसे जाणे बंद झाले. त्यांनी कस्टमर केअरला फोन लावून ही समस्या सांगितली, यावेळी कस्टमर केअर नंबरवरुन बोलणारा राजा राजपुत याने ढवळे यांना तुमच्या अकाऊंटमध्ये एरर आहे, असे सांगितले. तुमच्या मोबाईलवर आलेल्या नंबरची विचारणा केली. ढवळे यांनी फोन पे मध्ये जावून नंबर टाकले. यांच्या अकाऊंटमधून एकूण ९२,९७० रुपये कपात झाले. प्रकरणी राजपूत विरोधात गुन्हा दाखल केला.