94 कोटी रोख, 8 कोटींचे हिरे, 30 लग्झरी घड्याळं; इन्कम टॅक्सच्या छाप्यात 1 अब्ज संपत्ती जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2023 04:31 PM2023-10-16T16:31:40+5:302023-10-16T16:35:21+5:30

कर्नाटक, तेलंगणा, दिल्ली आणि आंध्र प्रदेशमधील 55 हून अधिक ठिकाणी कंत्राटदार आणि रिअल इस्टेट डेव्हलपर्सवर सुरू असलेल्या छाप्यांमध्ये आयकर विभागाने तब्बल 94 कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे.

94 crores in cash seized in income tax raids in karnataka telangana and ap and delhi | 94 कोटी रोख, 8 कोटींचे हिरे, 30 लग्झरी घड्याळं; इन्कम टॅक्सच्या छाप्यात 1 अब्ज संपत्ती जप्त

94 कोटी रोख, 8 कोटींचे हिरे, 30 लग्झरी घड्याळं; इन्कम टॅक्सच्या छाप्यात 1 अब्ज संपत्ती जप्त

कर्नाटक, तेलंगणा, दिल्ली आणि आंध्र प्रदेशमधील 55 हून अधिक ठिकाणी कंत्राटदार आणि रिअल इस्टेट डेव्हलपर्सवर सुरू असलेल्या छाप्यांमध्ये आयकर विभागाने तब्बल 94 कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे.

सीबीडीटीने दिलेल्या माहितीनुसार, या छापेमारीत 94 कोटी रुपये रोख, 8 कोटी रुपयांचं सोनं आणि हिऱ्यांचे दागिने आणि 30 लक्झरी घड्याळं जप्त करण्यात आली आहेत. 12 ऑक्टोबर रोजी शोध सुरू करण्यात आला आणि या काळात विभागाने बंगळुरू आणि शेजारच्या तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील काही शहरं तसेच दिल्लीतील 55 परिसरांवर छापे टाकले.

केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने (एसबीडीटी) एका निवेदनात म्हटले आहे की, "यामध्ये 94 कोटी रुपयांची बेहिशेबी रोकड आणि 8 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे सोने आणि हिऱ्यांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत, जे एकूण 102 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहेत." CBDT ने सांगितलं की, एका खासगी पगारदार कर्मचाऱ्याच्या आवारातून 30 लक्झरी विदेशी घड्याळांचं कलेक्शन जप्त करण्यात आलं आहे." 

"बेहिशेबी" रोख जप्त झाल्यानंतर, या मुद्द्यावरून कर्नाटकातील सत्ताधारी काँग्रेस आणि विरोधी भाजपा यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष नलीन कुमार कतील म्हणाले की, हा पैसा काँग्रेसशी संबंधित आहे. याच दरम्यान, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी हा आरोप निराधार असल्याचं म्हटले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
 

Web Title: 94 crores in cash seized in income tax raids in karnataka telangana and ap and delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.