हॉटेलच्या रुममधून ९५ ग्रॅम सोन्याचे दागिने चोरीला; दागिन्यांची किंमत ३ लाख ७५ हजार रुपये

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2020 06:59 PM2020-12-09T18:59:19+5:302020-12-09T18:59:25+5:30

शहरातील ब्रीज हॉटेलच्या रुम नं. ३०१ मधून ९५ ग्रॅम सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची घटना ६ डिसेंबर रोजी घडली.

95 grams of gold jewelery stolen from hotel room; The price of jewelery is 3 lakh 75 thousand rupees | हॉटेलच्या रुममधून ९५ ग्रॅम सोन्याचे दागिने चोरीला; दागिन्यांची किंमत ३ लाख ७५ हजार रुपये

हॉटेलच्या रुममधून ९५ ग्रॅम सोन्याचे दागिने चोरीला; दागिन्यांची किंमत ३ लाख ७५ हजार रुपये

googlenewsNext

लातूर : शहरातील ब्रीज हॉटेलच्या रुम नं. ३०१ मधून ९५ ग्रॅम सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची घटना ६ डिसेंबर रोजी घडली. याबाबत हॉटेलमधील नोकराविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

पोलिसांनी सांगितले, फिर्यादी श्रीकांत महावीर रोडा (२८, रा. सराफा बाजार रोड कॉम्प्लेक्स नांदेड) यांच्या पत्नीने ब्रीज हॉटेलमधील रुम नं.३०१ च्या ड्रॉवरमध्ये सोन्याचा एक हार, ५५ ग्रॅम, नेकलेस ४० ग्रॅम असे एकूण ९५ ग्रॅम सोन्याचे दागिने ठेवले होते. दागिन्यांची किंमत ३ लाख ७५ हजार रुपये असून, हॉटेलमधील कोण्या तरी एका नोकराने दागिने चोरले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार शिवाजीनगर पोलीस ठाण्यात ब्रीज हॉटेल लातूरधील नोकर (नाव माहीत नाही) विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास अंमलदार शिंदे करीत आहेत.

Web Title: 95 grams of gold jewelery stolen from hotel room; The price of jewelery is 3 lakh 75 thousand rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.