उल्हासनगरात पोलीस उपायुक्तांच्या कारवाईने गुन्हेगारांची दाणादाण, 3 दिवसात 96 गुन्हे दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2018 05:15 PM2018-11-18T17:15:37+5:302018-11-18T17:15:53+5:30

उल्हासनगर शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी 3 दिवसाच्या विशेष पोलीस कारवाईत तब्बल 96 जनावर प्रतिबंधात्मक गुन्हे तर चौघांवर एमपीडीए तर तिघांवर हद्दपारीची कारवाई पोलीस उपायुक्त प्रमोदकुमार शेवाळे यांनी केली.

96 cases filed against Criminals in 3 days | उल्हासनगरात पोलीस उपायुक्तांच्या कारवाईने गुन्हेगारांची दाणादाण, 3 दिवसात 96 गुन्हे दाखल

उल्हासनगरात पोलीस उपायुक्तांच्या कारवाईने गुन्हेगारांची दाणादाण, 3 दिवसात 96 गुन्हे दाखल

googlenewsNext

- सदानंद नाईक 

उल्हासनगर -  शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी 3 दिवसाच्या विशेष पोलीस कारवाईत तब्बल 96 जनावर प्रतिबंधात्मक गुन्हे तर चौघांवर एमपीडीए तर तिघांवर हद्दपारीची कारवाई पोलीस उपायुक्त प्रमोदकुमार शेवाळे यांनी केली. पोलीस कारवाईने गुन्हेगारात खळबळ उडाली असून पुन्हा अशीच विशेष पोलीस कारवाईचे संकेत शेवाळे यांनी दिले आहे.

 उल्हासनगरात दोन महिन्यात 5 खुनाच्या घटना घडल्या असून बलात्कार, अपहरण, दरोडा, चोरी, फसवणूक , हाणामारी, मोटारसायकली चोरी आदी घटनेत वाढ झाली. याप्रकाराने  नागरिकांत भीती व असंतोष निर्माण होऊन व्यापारी, विविध राजकीय पक्षांनी पोलीस उपायुक्त प्रमोदकुमार शेवाळे यांना निवेदन देऊन गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी साकडे घातले. शेवाळे यांनी 11 ते 13 नोव्हेंबर दरम्यान पोलीस अधिकाऱ्याच्या मदतीने गेल्या तीन दिवसात विशेष कारवाई केली. रात्री उशिरा पर्यंत चालणाऱ्या एकूण 88 गाडीधारकावर केसेस दाखल केल्या. यातील बहुतांश गाडीवर  अवैधपणे दारू विक्री होत होती. तर 14 जनावर दारु पिवून वाहन चालविन्याचा गुन्हा दाखल केला आहे.  

शहरातील नांमचीन गुंड  प्रविण उर्फ प-या शिवाजी अवघडे व जगदिश उर्फ  जग्गु तीरथसिग लबाना यांनी हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन करुन, शहरात मिळून आल्याने त्यांचेवर म.पो.का.क.142 प्रमाणे गुन्हे दाखल केले. तर सार्वजनीक ठीकाणी अंशातता करणाऱ्या तिघांवर, घातक हत्यारे जवळ बाळगणाऱ्या एकावर, तसेच  अवी उर्फ बादशहा अजितसिंग लभाना, राजा अरमूगम पडयाची उर्फ अंडा राजा, शरीफ सलीम शेख, नविन कन्हैय्यालाल केशवानी अश्या चौघावर एम.पी.डी.ए. अंतर्गत कारवाई करून स्थानाबध्द करण्यात आले. तसेच हरदिप कमलजित सिंग, करण मनोहर ढकणी, रवी गणेश गांजगी असे एकुण 3 जनावर हद्दपारीची कारवाई करण्यात आली. असे एकुण 96 जनावर 3 दिवसाच्या विशेष कारवाईत गुन्हे दाखल केले असून याकारवाईने गुन्हेगारांचे व अवैध धंदे करणा-यांचे धाबे दणाणले आहे.

Web Title: 96 cases filed against Criminals in 3 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.