रिसोड शहरातून प्रतिबंधित गुटख्यासह ९.९३ लाखांचा ऐवज जप्त, परिविक्षाधीन उपअधीक्षकांच्या पथकाची कारवाई
By दिनेश पठाडे | Published: May 2, 2023 07:16 PM2023-05-02T19:16:25+5:302023-05-02T19:16:48+5:30
वाशिम : रिसोड शहरातील सराफ लाईन धोबी गल्लीत एका ठिकाणी पोलिसांनी १ मे रोजी धाड टाकून चारचाकी वाहनासह महाराष्ट्र ...
वाशिम : रिसोड शहरातील सराफ लाईन धोबी गल्लीत एका ठिकाणी पोलिसांनी १ मे रोजी धाड टाकून चारचाकी वाहनासह महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा व पान मसाला मिळून एकू ९ लाख ९२ हजार ९६० रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी आरोपींना ताब्यात घेऊन रिसोड पोलिस स्टेशनमध्ये सोमवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रिसोड शहरात प्रतिबंधित गुटख्याची विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर परिविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक अमर मोहिते व त्यांच्या सहकाऱ्यांनी शहरातील सराफ लाईन धोबी गल्लीतील सागर तापडिया व अक्षय तापडिया यांच्या घरी धाड टाकली. त्यावेळी महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा व पान मसाला असा एकूण नऊ लाख ९२ हजार ९६० रुपयाचा मुद्देमाल चार चाकी वाहनासह विक्री करता साठवल्याचे आढळून आले. पोलिसांनी वाहनासह प्रतिबंधित गुटखा जप्त करीत आरोपींवर रिसोड पोलिस स्टेशनमध्ये भादंवि कलम ३२८, २७३, ३४ सह अन्न व सुरक्षा मानके कायदा ५९ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे, तसेच आरोपी सागर सुनील तापडिया व अक्षय सुनील तापडिया यांना अटक करण्यात आली आहे. परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक अमर मोहिते व त्यांचे सहकारी पो. काँ. अमोल कांबळे, राजकुमार यादव, रोशन राठोड आणि महिला पोलिस कॉन्स्टेबल अर्चना चव्हाण यांनी ही कारवाई केली.