९वीच्या विद्यार्थिनीला अ‍ॅसिड टाकून जाळले, मृतदेह तलावात दिला फेकून

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2022 04:24 PM2022-03-31T16:24:54+5:302022-03-31T16:25:34+5:30

Acid Attack : संतप्त नागरिकांनी पोलिस ठाण्यासमोर केली निदर्शने

9th standard student burnt by throwing acid, body thrown in pond | ९वीच्या विद्यार्थिनीला अ‍ॅसिड टाकून जाळले, मृतदेह तलावात दिला फेकून

९वीच्या विद्यार्थिनीला अ‍ॅसिड टाकून जाळले, मृतदेह तलावात दिला फेकून

Next

धनबाद/रांची - धनबादच्या जोरापोखर पोलीस स्टेशन परिसरातून गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या ९वीच्या वर्गातील मुलीचा मृतदेह मंगळवारी तलावात तरंगताना आढळून आला. मुलीचा चेहरा आणि शरीर  अ‍ॅसिडने जाळल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. येथील न्यू किड्स गार्डन स्कूलमध्ये शिकणारा १५ वर्षीय विद्यार्थिनी  गेल्या २६ मार्च रोजी दुपारी ४ वाजता घरातून शिकवणीसाठी बाहेर पडली आणि तेव्हापासून बेपत्ता होती.

कुटुंबीयांनी स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मंगळवारी तिचा मृतदेह सापडल्याची बातमी पसरल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेच्या निषेधार्थ मुलीच्या कुटुंबीयांनी आणि स्थानिक लोकांनी पोलिस ठाण्यासमोर निदर्शने केली.



मुलीचे वडील सौदी अरेबियातील एका कंपनीत काम करतात. संपूर्ण कुटुंब जोरपोखर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बरारी क्रमांक 7 परिसरात राहते. मंगळवारी विद्यार्थिनीचा मृतदेह सापडल्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. मुलीवर बलात्कार झाल्याचा संशय आहे. त्यानंतर  अ‍ॅसिड  टाकून तिची हत्या करण्यात आली. पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतरच याबाबत काही सांगता येईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

मुलीच्या घरातील रहिवाशांचे म्हणणे आहे की, ती बेपत्ता झाल्यानंतर प्रथम नातेवाईकांची देखील चौकशी करण्यात आली आणि संभाव्य ठिकाणी शोध घेण्यात आला. काहीही निष्पन्न न झाल्याने त्याची लेखी तक्रार जोरापोखर पोलिसांना देण्यात आली. नातेवाईक असलेल्या चुलत भावाच्या जुन्या वैमनस्याचा संदर्भ देत त्याच्यावरही संशय व्यक्त करण्यात आला.

पोलिसांनी सहकार्य केले नसल्याचा आरोप मुलीच्या कुटुंबीयांनी केला आहे. पोलिसांनी तत्काळ तपास केला असता तर ती जिवंत सापडली असती. जोरापोखर पोलीस ठाण्याचे प्रभारी राजदेव सिंह यांनी सांगितले की, प्रथमदर्शनी हे हत्याकांड असल्याचे दिसते. पोत्यासोबतच तलावाजवळून प्लास्टिकची दोरी, वह्या, पेन, मास्क, पिशवी, कटर, शूज आदी साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे.

Web Title: 9th standard student burnt by throwing acid, body thrown in pond

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.