१३ वर्षांच्या मुलीवर पालनकर्त्या काकाकडूनच अत्याचार, पिडितेची पोलिसात धाव

By विलास जळकोटकर | Published: May 2, 2023 06:32 PM2023-05-02T18:32:55+5:302023-05-02T18:33:21+5:30

याप्रकरणी स्वत: पिडितेनी पोलिसांत धाव घेऊन तक्रार दिल्याने काकाविरोधात सोमवारी (१ मे) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

A 13-year-old girl was abused by her foster uncle, the victim ran to the police | १३ वर्षांच्या मुलीवर पालनकर्त्या काकाकडूनच अत्याचार, पिडितेची पोलिसात धाव

१३ वर्षांच्या मुलीवर पालनकर्त्या काकाकडूनच अत्याचार, पिडितेची पोलिसात धाव

googlenewsNext

सोलापूर : नातेसंबंधांना काळिमा फासणाऱ्या अनेक घटना समाजात घडत असतात. याच प्रकारे सोलापूरच्या एका भागात वडिलांना दिसत नसल्याने आईने दुसरे लग्न केले, म्हणून काकाकडे पालनपोषण होत असताना, काकानेच १३ वर्षांच्या मुलीवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी स्वत: पिडितेनी पोलिसांत धाव घेऊन तक्रार दिल्याने काकाविरोधात सोमवारी (१ मे) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिडितेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, तिच्या वडिलांना दिसत नसल्याने आईने दुसऱ्या व्यक्तीशी लग्न केले. यामुळे तिच्या पालनपोषणाची जबाबदारी आजी-आजोबांकडे आली. एक वर्षापूर्वी काकाने आजी-आजोबाकडून मी सांभाळतो म्हणून पिडितेला आपल्या कुटुंबामध्ये आणले. २८ तारखेच्या रात्री जेवण आटोपून सर्वजण झोपलेले होते. शनिवारच्या पहाटे (२९ मे) संशयित आरोपी काकाने पिडितेला तोंड दाबून उचलून दुसऱ्या खोलीत नेले आणि अत्याचार केला.

घाबरलेल्या पिडितेने हा प्रकार तिच्या वडिलांना व आजी-आजोबाना सांगितला पण काहीच सूचेनासे झाल्याने कोठे वाच्यता केली नाही. सोमवारी (१ मे) काका आणि जवळच राहत असलेल्या आजोबाच्या घरी येऊन भांडण करीत होते. पिडितेने हिम्मत करुन डायल ११२ ला फोन करुन भांडणाबद्दल व स्वत:वर काकाने अत्याचार केल्याचे सांगितले. पोलिस व्हॅन तेथे आली. पिडितेने पोलीस ठाण्यात जाऊन जबाब दिल्यानुसार काकाविरुद्ध भा. दं. वि. ३७६ (२) सह बाल लैंगिक छळ कायद्यान्वये गुन्हा नोंदवला आहे. अधिक तपास सुरु आहे.
 

Web Title: A 13-year-old girl was abused by her foster uncle, the victim ran to the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.