लग्न ठरविताना दाखवलेली २० वर्षांची मुलगी; नवरदेव सुहाग रात्रीच्या दिवशीच हादरला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2022 11:44 AM2022-10-13T11:44:31+5:302022-10-13T11:45:03+5:30
नवरीला घरी घेऊन आल्यावर खरा प्रकार उघड झाला. यामुळे तिच्याशी पहिल्या रात्रीपासूनच शरीर संबंध देखील ठेवले नसल्याचा दावा इरफानने केला आहे.
उत्तर प्रदेशच्या राय बरेलीमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका वनकर्मचारी असणाऱ्या तरुणासोबत घोर फसवणूक झाली आहे. त्याचा २० वर्षांची तरुणी दाखवून ४८ वर्षांच्या महिलेशी विवाह लावण्यात आला आहे. या वनकर्मचाऱ्याने फसवणूक झाल्याची तक्रार एसएसपींकडे केली आहे. सासरच्यांनी तो विरोध करतोय म्हणून त्याच्यावरच हुंडा मागितल्याचा आणि त्रास देत असल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
बारादरी भागातील मोहल्ला बाजारिया इनायत खान येथे राहणारा मोहम्मद इरफान हा वन विभागाचा कर्मचारी असून तो पिलीभीत येथे तैनात आहे. इरफानच्या म्हणण्यानुसार, लग्न ठरवताना सासरच्या लोकांनी त्याला 20 वर्षांची मुलगी दाखवली. परंतु मे 2021 मध्ये त्याचा 48 वर्षीय महिलेशी विवाह लावून देण्यात आला.
नवरीला घरी घेऊन आल्यावर खरा प्रकार उघड झाला. यामुळे तिच्याशी पहिल्या रात्रीपासूनच शरीर संबंध देखील ठेवले नसल्याचा दावा इरफानने केला आहे. त्याला दाखवण्यात आलेली मुलगी बदायूं येथील जलनघरी सराय येथील अविवाहित रहिवासी होती. परंतू महिलेशी विवाह लावण्यात आल्याचा विरोध केला असता त्याच्यावर बदायूंमध्ये हुंड्यासाठी छळाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी कोणताही तपास केला नाही. ज्या महिलेसोबत त्याचे लग्न लावण्यात आले, तिच्यावर बरेलीतील एका मानसिक आजाराच्या डॉक्टरांकडून उपचार सुरू आहेत. इरफानचा आरोप आहे की, त्याचे सासरचे लोक त्याला आणि त्याच्या बहिणीला गलिच्छ मेसेज पाठवण्याची धमकी देत आहेत. तसेच त्याची वन विभागातील नोकरी त्या महिलेला मिळावी म्हणून मारण्याचा प्लॅनही त्यांनी बनविल्याचा आरोप इरफानने केला आहे.