न्यूड व्हिडीओ अन् सात मुलांकडून २० वर्षीय विद्यार्थिनीवर १६ महिने बलात्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2025 17:13 IST2025-03-13T17:10:48+5:302025-03-13T17:13:53+5:30
Banaskantha Rape Case: गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्यातील पालनपूरमध्ये ही संतापजनक घटना घडली आहे. आरोपींनी व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन अत्याचार केले.

न्यूड व्हिडीओ अन् सात मुलांकडून २० वर्षीय विद्यार्थिनीवर १६ महिने बलात्कार
Gujarat rape case: इन्स्टाग्रामवर मैत्री केली. नंतर महाविद्यालयात जाण्यास सुरूवात केल्यानंतर तिचा विश्वास संपादन केला. एक दिवस ब्रेकफास्ट करण्यासाठी ये म्हणून आग्रह केला. जेव्हा ती हॉटेलमध्ये गेली, तेव्हा मुद्दाहून तिच्या कपड्यावर अन्न टाकले आणि ती कपडे साफ करण्यास गेल्यावर तिचा निर्वस्त्र अवस्थेत व्हिडीओ बनवला. यानंतर तब्बल १६ महिने तिच्यावर वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन अत्याचार करण्यात आले. गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्यातील पालनपूरमध्ये ही संतापजनक घटना घडली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
गुजरातच्या बनासकांठा जिल्ह्यात एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर सात जणांनी १६ महिने बलात्कार केल्याचे प्रकरण पीडितेने पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर समोर आले. तिचे विवस्त्र अवस्थेतील व्हिडीओ वापरून तिला ब्लॅकमेल करण्यात आले.
पीडित तरुणीसोबत इन्स्टाग्रामवर मैत्री केली
पोलिसांनी सांगितले की, सहा आरोपींपैकी एकाने २० वर्षीय युवतीशी इन्स्टाग्रामवर मैत्री केली. तेव्हा तिने २०२३मध्ये पालनपूर येथील महाविद्यालयात जाण्यास प्रारंभ केला होता. नोव्हेंबर २०२३मध्ये त्याने युवतीला एका हॉटेलमध्ये नाष्ट्यासाठी चलण्याचा आग्रह केला.
एका खोलीत नेले, कपडे स्वच्छ करताना बनवला व्हिडीओ
इन्स्टाग्रामवर मैत्री झालेल्या तरुणाने आग्रह केल्याने ती गेली. त्यानंतर त्याने हेतुपुरस्सर तिच्या कपड्यांवर अन्नपदार्थ सांडले. ते स्वच्छ करण्याच्या बहाण्याने तिला एका खोलीत नेले. ती तिचे कपडे स्वच्छ करीत असताना विशाल चौधरी नामक युवक खोलीत गेला व त्याने व्हिडीओ बनवला.
नोव्हेंबर २०२३ ते फेब्रुवारी २०२५: अनेक ठिकाणी नेऊन बलात्कार केला
युवतीने त्याला विरोध केला असता त्याने व्हिडीओ सार्वजनिक करण्याची धमकी दिली. त्याच व्हिडीओ क्लिपचा वापर करून विद्यार्थिनीवर नोव्हेंबर २०२३ ते फेब्रुवारी २०२५ दरम्यान विविध ठिकाणी त्याने व इतरांनी बलात्कार केला.
सातत्याने होत असलेल्या लैंगिक अत्याचारा कंटाळून तरुणीने पालनपूर तालुका पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार दिली. युवतीने पोलिसांशी संपर्क साधल्यानंतर ७ जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील बलात्कार व धमकीशी संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.